मुंबई : कुणालाही परदेशात खाते उघडण्यासाठी वैध कारण असू शकते. पनामातून उघड झालेल्या दस्तावेजात नावे आलेल्या भारतीयांच्या खात्याच्या वैधानिकतेची चौकशी विविध तपास संस्थांचा समावेश असलेली चौकशी पथक करेल, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट केले.
पनामा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने सोमवारी चौकशी पथक स्थापन करीत असल्याची घोषणा केली होती. या पथकात रिझर्व्ह बँकेचाही समावेश करण्यात आला आहे. पनामा दस्तावेजात ५00 भारतीयांची नावे आहेत. राजन म्हणाले की, चौकशी करणाऱ्या पथकात आमचाही समावेश आहे. देशाच्या बाहेर खाते ठेवण्याचे वैध कारण काय असू शकते हे पाहावे लागेल. त्याचा तपास करावा लागेल.
एलआरएस योजनेनुसार देशात राहणाऱ्या वयस्क, अल्पवयस्क व्यक्तींना एक वर्षात कोणत्याही स्वीकृत चालू किंवा भांडवली खात्यात किंवा दोन्हीत एकूण २,५0,000 डॉलरचे भांडवल बाहेर पाठविण्याची सूट आहे. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. या चौकशी पथकात सीबीडीटी रिझर्व्ह बँक आणि एफआययू यांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एच.आर. खान म्हणाले की, या प्रकरणात २-३ मुद्यांचा समावेश आहे. ‘फेमा’ तहत काही बाबींना मंजुरी आहे आणि काहींना नाही. त्यामुळेच चौकशीतून योग्य ते निष्पन्न होईल.
‘विदेशी खात्यांची वैधता तपासणार’
कुणालाही परदेशात खाते उघडण्यासाठी वैध कारण असू शकते. पनामातून उघड झालेल्या दस्तावेजात नावे आलेल्या भारतीयांच्या खात्याच्या वैधानिकतेची चौकशी विविध तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2016 04:47 IST2016-04-06T04:47:50+5:302016-04-06T04:47:50+5:30
कुणालाही परदेशात खाते उघडण्यासाठी वैध कारण असू शकते. पनामातून उघड झालेल्या दस्तावेजात नावे आलेल्या भारतीयांच्या खात्याच्या वैधानिकतेची चौकशी विविध तपास
