Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने तस्करीसाठी कस्टम्स केंद्राचा वापर

सोने तस्करीसाठी कस्टम्स केंद्राचा वापर

तस्कर येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम्स ड्यूटी फ्री केंद्राचा तस्करीचे सोने देशात आणण्यासाठी वापर करीत असल्यामुळे कस्टम्स

By admin | Updated: August 30, 2015 22:01 IST2015-08-30T22:01:28+5:302015-08-30T22:01:28+5:30

तस्कर येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम्स ड्यूटी फ्री केंद्राचा तस्करीचे सोने देशात आणण्यासाठी वापर करीत असल्यामुळे कस्टम्स

Use of Customs Center for Gold Smuggling | सोने तस्करीसाठी कस्टम्स केंद्राचा वापर

सोने तस्करीसाठी कस्टम्स केंद्राचा वापर

नवी दिल्ली : तस्कर येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम्स ड्यूटी फ्री केंद्राचा तस्करीचे सोने देशात आणण्यासाठी वापर करीत असल्यामुळे कस्टम्स अधिकाऱ्यांना अधिक जागरूक राहावे लागत आहे.
सोन्याची तस्करी प्रामुख्याने विमानातील कर्मचारी आणि विमानतळावर सेवा देणारे विमान कंपनीचे अन्य कर्मचारी यांच्यामार्फत होते. ती रोखण्यासाठी अधिकारी आता विमानतळावर मोबाईल फोन नेण्यास बंदी करण्याचा विचार करीत आहेत.
महसूल गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमान कंपन्या, स्थलांतर, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, कस्टम्स व दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिकाऱ्यांशी बैठकीत चर्चा केली त्यात तस्करी रोखण्यासाठी विविध मुद्यांवर चर्चा झाली. अनेक प्रवासी ड्यूटी फ्री शॉपमध्ये तस्करीचे सोने विमानतळावरील कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करून ठेवतात. नंतर हेच सोने कर्मचाऱ्याकडून विमानतळाबाहेर नेले जाते. सोन्याची तस्करी रोखण्यासाठी या कर्मचाऱ्यांना विमानतळावर मोबाईल फोन वापरण्यास मनाई करावी व त्यांना विमानतळाच्या बाहेर जाण्यास मनाई करावी, अशी बैठकीत मागणी करण्यात आली.

Web Title: Use of Customs Center for Gold Smuggling