नवी दिल्ली : येत्या चार वर्षांपर्यंत युरिया या रासायनिक खताच्या किमतीत सरकार कुठलीही वाढ होऊ देणार नाही, असा दिलासा केंद्रीय खते आणि रासायनिक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिला. आयात कमी करण्यासाठी बंद पडलेले चार युरिया कारखाने सुरू केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
एका पत्रपरिषदेत अहीर बोलत होते. चार वर्षांपर्यंत युरियाच्या किमतीत कुठलीही वाढ न करण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला आहे. ५० किलोच्या एका बॅगेची किंमत २६८ रुपये असेल आणि नीम कोटेड युरियाच्या प्रत्येक बॅगेसाठी १४ रुपये अतिरिक्त घेतले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
युरियाची आयात कमी करण्यासाठी बिहारच्या बरौनी, उत्तर प्रदेशातील गोरखपूर, ओडिशाच्या तलचर आणि आंध्र प्रदेशातील रामागुंडम खत कारखाने याचवर्षी सुरू करण्यात येतील. हे कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी २० हजार कोटी खर्च केले जातील आणि यातून दरवर्षी ५२ लाख टन युरियाचे उत्पादन होईल. याशिवाय ओरबा, सिन्दरी आणि दुर्गापूर येथील खत कारखानेही पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न केले जातील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
त्यांनी सांगितले की, देशात ३१० लाख टन युरियाची गरज आहे; मात्र उत्पादन केवळ २२० लाख टन होते. मागणीच्या पूर्ततेसाठी ८० ते ९० लाख टन युरिया आयात केला जातो. यावर्षी यापैकी २० लाख टन युरियाची आयात करण्याची सरकारची योजना आहे.
देशात वायूची कमतरता आहे यामुळे उत्पादित युरिया महाग होतो. यामुळे सरकार कोळसा आधारित युरिया कारखाने सुरू करून यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्याचे प्रयत्न करील.
कोळशापासून युरिया उत्पादनासाठी जर्मन तंत्रज्ञान स्वीकारण्याचा सरकारचा विचार आहे. कोळशामुळे उत्पादित युरिया तुलनेने अधिक स्वस्त पडतो.
(लोकमत न्यूज नेटवर्क )
युरियाच्या किमती ४ वर्षांपर्यंत जैसे थे
येत्या चार वर्षांपर्यंत युरिया या रासायनिक खताच्या किमतीत सरकार कुठलीही वाढ होऊ देणार नाही, असा दिलासा केंद्रीय खते आणि रासायनिक
By admin | Updated: May 16, 2015 01:09 IST2015-05-16T01:09:22+5:302015-05-16T01:09:22+5:30
येत्या चार वर्षांपर्यंत युरिया या रासायनिक खताच्या किमतीत सरकार कुठलीही वाढ होऊ देणार नाही, असा दिलासा केंद्रीय खते आणि रासायनिक
