Lokmat Money > बिझनेस न्यूज > “भारत MedTechमधील हिस्सा १० ते १२ टक्क्यांपर्यंत वाढवणार”: केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल

“भारत MedTechमधील हिस्सा १० ते १२ टक्क्यांपर्यंत वाढवणार”: केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल

MedTekon 2025: दिल्लीतील ताज पॅलेसमध्ये मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया (MTaI) यांचा प्रमुख कार्यक्रम मेडटेकॉन 2025चे आयोजन करण्यात आले होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2025 22:35 IST2025-02-01T22:34:22+5:302025-02-01T22:35:15+5:30

MedTekon 2025: दिल्लीतील ताज पॅलेसमध्ये मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया (MTaI) यांचा प्रमुख कार्यक्रम मेडटेकॉन 2025चे आयोजन करण्यात आले होते.

union minister of state for health and family welfare and chemicals and fertilizers anupriya patel said india to expand Global medtech share to 10 to 12 percent by 2030 | “भारत MedTechमधील हिस्सा १० ते १२ टक्क्यांपर्यंत वाढवणार”: केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल

“भारत MedTechमधील हिस्सा १० ते १२ टक्क्यांपर्यंत वाढवणार”: केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल

MedTekon 2025: दिल्लीतील ताज पॅलेसमध्ये मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया (MTaI) यांचा प्रमुख कार्यक्रम मेडटेकॉन 2025चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात धोरणकर्ते, गुंतवणूकदार आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील नेत्यांनी सहभाग घेतला. गुंतवणूक आणि सुधारणांवर या कार्यक्रमात भर देण्यात आला होता. भारताच्या वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक वाढ आणि तांत्रिक प्रगतीचा अजेंडा या कार्यक्रमात निश्चित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी संबोधित केले. २०३० पर्यंत भारताचा जागतिक वैद्यकीय तंत्रज्ञानातील हिस्सा १०-१२ टक्क्यांपर्यंत वाढेल, असा विश्वास अनुप्रिया पटेल यांनी व्यक्त केला. 

देशाच्या MedTech क्षेत्राचे भविष्य घडविण्यासाठी प्रमुख उद्योग, व्यावसायिक, धोरणकर्ते आणि आरोग्यसेवा देणाऱ्यांना एकत्र आणणारा प्रमुख मंच असलेल्या MedTekon 2025चे उद्घाटन करायला मिळणे हा एक सन्मान आहे. २०३० पर्यंत याचा बाजारपेठेतील अवाका दुप्पट होऊन ३० अब्ज डॉलर्सपर्यंत नेणे आणि जागतिक स्तरावरील हिस्सा १.६५ टक्क्यांवरून १० ते १२ टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या मार्गावर हे क्षेत्र यशस्वीपणे पुढे जात आहे. भारत वेगाने वैद्यकीय तंत्रज्ञानाचे एक महाशक्ती केंद्र म्हणून उदयास येत आहे. यामुळे संशोधन, गुंतवणूक आणि धोरण सुधारणांमध्ये सहयोगात्मक प्रयत्न हे भारताला परवडणाऱ्या तसेच उच्च-गुणवत्तेच्या वैद्यकीय तंत्रज्ञानात अग्रणी बनवण्यासाठी महत्त्वाचे ठरतील, असे अनुप्रिया पटेल यांनी सांगितले. 

भारताला जागतिक स्तरावर MedTech क्षेत्रात अग्रणी बनवणे आवश्यक: डॉ. व्ही. के. पॉल

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यावेळी बोलताना म्हणाले की, MedTekon 2025 हे भारताच्या जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादनाला बळकटी देणारा एक योग्य मंच म्हणून काम करत आहे. वैद्यकीय उपकरणांच्या वाढत्या मागणीमुळे भारताला जागतिक स्तरावर MedTech क्षेत्रात अग्रणी म्हणून स्वतःला प्रस्थापित करावे लागेल. भारतातील ४ हजारहून अधिक आरोग्य-तंत्रज्ञान स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी अधिक गुंतवणूक आणि नियामकांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास आणि या क्षेत्राच्या वाढीसाठी नियामक मानकांचे जागतिक बेंचमार्कशी सुसंगतीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गुंतवणूक आणि धोरणात्मक स्थिरतेवर लक्ष केंद्रित केल्याने परवडणाऱ्या आणि उच्च-गुणवत्तेच्या वैद्यकीय तंत्रज्ञानात भारताची आघाडीची भूमिका मजबूत होऊ शकते.

मजबूत MedTech पायाभूत सुविधांच्या गरजांवर भर आवश्यक: पवन चौधरी

MTaIचे अध्यक्ष पवन चौधरी यांनी भारताच्या वाढत्या आरोग्यसेवेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक अनुकूल धोरणे आणि मजबूत MedTech च्या पायाभूत सुविधांच्या गरजांवर भरद दिला. अमानवीकरण आणि जास्त ताण यासाठी तंत्रज्ञान जबाबदार आहे का?, यावर पवन चौधरी यांनी असहमती दर्शवली. त्यांनी यावर भर दिला की, हिकिकोमोरी (जपानमध्ये वापरला जाणारा शब्द) सारख्या समुदायांचा उदय मानवी संपर्कापेक्षा तंत्रज्ञानावर आधारित संवादांना प्राधान्य देणाऱ्या लोकांमुळे झाला आहे. कारण मानवी संपर्क तंत्रज्ञानाइतका महत्त्वाचा नाही. काही प्रमाणात ताण येऊ शकतो. यंत्रे न्याय करत नाहीत आणि थकत नाहीत. म्हणूनच जगभरातील लाखो हिकिकोमोरी त्यांना आवडतात आणि त्यांची संख्या वाढतच आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात प्रमुख वक्ते असीम साहू (उप-औषध नियंत्रक, CDSCO), अजित चव्हाण (अतिरिक्त सीईओ, GeM), रितू सैन (गुंतवणूक आयुक्त, छत्तीसगड सरकार), हितेंद्र साहू (संचालक, औषधनिर्माण विभाग), चिन्मय द्विवेदी (एमएचडी प्रमुख बीआईएस), पद्मश्री डॉ. कामेश्वर प्रसाद (एम्स आणि फोर्टिस हेल्थकेअर), डॉ. ओपी यादव (सीईओ, नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूट), डॉ. पवन गुरहा (विभागाध्यक्ष, एनेस्थिसियोलॉजी, बत्रा अस्पताल रुग्णालय), संजय भुटानी (एमडी, बॉश अँड लॉम्ब इंडिया और सार्क), अमन ऋषी (व्हीपी अँड जीएम, स्ट्रायकर इंडिया), अतुल ग्रोव्हर (व्यवस्थापकीय संचालक, भारत आणि दक्षिण आशिया, बेक्टन डिकिन्सन), परमेश्वरन नायर (कंट्री लीडर, एसईए रीजन अँड इंडिया, एडवर्ड्स लाईफसायन्सेस) आणि अन्य प्रमुख मान्यवर उपस्थित होते. तसेच परदेशी मान्यवरांमध्ये डॉ. स्टीफन हेसेलमॅन (जर्मन दूतावासातील मंत्री सल्लागार), एस्टेल डेव्हिड (फ्रेंच दूतावासातील व्यापार आणि गुंतवणूक आयुक्त), निको शिएट्टेकाटे (आरोग्य आणि कल्याण सल्लागार, नेदरलँड्स दूतावास) आणि अण्णा शॉटबोल्ट (उप व्यापार आयुक्त, दक्षिण आशिया, ब्रिटिश उच्चायुक्तालय) उपस्थित होते. 
 

Web Title: union minister of state for health and family welfare and chemicals and fertilizers anupriya patel said india to expand Global medtech share to 10 to 12 percent by 2030

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.