कल्हापूर : पायाचा आणि मातीचा अगदी जवळचा संबंध आहे. बालपणापासूनच मातीला माता समजून तिची जन्मभर सेवा करण्याची वृत्ती जपा, असे प्रतिपादन कोल्हापूर शिक्षण विभागाचे उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी केले. सदर बाजारमधील प्रकाश विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांना बूट व पायमोजे वाटप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक शिक्षण संचालक संपतराव गायकवाड होते. प्रकाश विद्यामंदिर येथे विचारे माळबरोबरच तावडे हॉटेल परिसरातील उंटवाले, फुगेवाले व वीटभी कामगारांची २७५ मुले-मुली शिक्षण घेतात. या वंचित घटकातील बालवाडी ते सातवीपर्यंतच्या सर्व मुलांना लेखाधिकारी तनुजा राणे यांच्यावतीने बूट व पायमोजे देण्यात आले. यावेळी वेतनपथक अधीक्षक किरण शिरोळकर, संस्थेचे सेक्रेटरी अशोक पांढरबळे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक भरत रसाळे यांनी प्रास्ताविक केले, तर कमल पांढरबळे यांनी आभार मानले. कुसुम पांढरबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास सुजाता सावंत, उमेश सावंत, माजी मुख्याध्यापक कुमार दाभाडे, चंद्रकांत पांढरबळे यांच्यासह सर्व शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. --------------०१ कोल - प्रकाश प्रकाश विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांना बूट व पायमोजे वाटपप्रसंगी तनुजा राणे, एम. के. गोंधळी, संपतराव गायकवाड, किरण शिरोळकर, अशोक पांढरबळे, भरत रसाळे, आदी उपस्थित होते.
बालपणापासून मातीला माता समजून सेवा करा : गोंधळी
कोल्हापूर : पायाचा आणि मातीचा अगदी जवळचा संबंध आहे. बालपणापासूनच मातीला माता समजून तिची जन्मभर सेवा करण्याची वृत्ती जपा, असे प्रतिपादन कोल्हापूर शिक्षण विभागाचे उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी केले.
By admin | Updated: September 1, 2014 20:01 IST2014-09-01T20:01:07+5:302014-09-01T20:01:07+5:30
कोल्हापूर : पायाचा आणि मातीचा अगदी जवळचा संबंध आहे. बालपणापासूनच मातीला माता समजून तिची जन्मभर सेवा करण्याची वृत्ती जपा, असे प्रतिपादन कोल्हापूर शिक्षण विभागाचे उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी केले.
