नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलनंतर रविवारी विमान इंधन आणि विनाअनुदानित एलपीजीचे दर वाढविल्याने महागाईच्या झळा अधिकच वाढतील. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव भडकल्याच्या पार्श्वभूमीवर तेल विपणन कंपन्यांनी विमान इंधनाचे दर ८.२ टक्क्यांनी, तर विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दर ५ रुपयांनी वाढविले आहेत.
दरवाढीमुळे दिल्लीत विमान इंधन प्रतिकिलोलिटर ३,८४९.९७ रुपयांनी महाग होणार आहे. त्यानुसार दिल्लीत आता प्रतिकिलोलिटर ५०,३६३ रुपये मोजावे लागतील. आॅगस्टपासून सलग सात वेळा विमान इंधनाचे (एटीएफ) दर कमी करण्यात आल्यानंतर विमान इंधनाचे दर वाढविण्यात आले आहेत.
विनाअनुदानित गॅस, विमान इंधन झाले महाग
पेट्रोल आणि डिझेलनंतर रविवारी विमान इंधन आणि विनाअनुदानित एलपीजीचे दर वाढविल्याने महागाईच्या झळा अधिकच वाढतील.
By admin | Updated: March 1, 2015 23:12 IST2015-03-01T23:12:19+5:302015-03-01T23:12:19+5:30
पेट्रोल आणि डिझेलनंतर रविवारी विमान इंधन आणि विनाअनुदानित एलपीजीचे दर वाढविल्याने महागाईच्या झळा अधिकच वाढतील.
