lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > उल्हासनगर महापालिकेत पाणीप्रश्नावरून पुन्हा राडा

उल्हासनगर महापालिकेत पाणीप्रश्नावरून पुन्हा राडा

* पाणी बाटल्या व खुर्च्यांची फेकाफेकी, नगरसेवक धावले आयुक्तांवर

By admin | Published: August 21, 2014 09:45 PM2014-08-21T21:45:40+5:302014-08-21T21:45:40+5:30

* पाणी बाटल्या व खुर्च्यांची फेकाफेकी, नगरसेवक धावले आयुक्तांवर

Ulhasnagar reopens on water dispute in the municipal corporation | उल्हासनगर महापालिकेत पाणीप्रश्नावरून पुन्हा राडा

उल्हासनगर महापालिकेत पाणीप्रश्नावरून पुन्हा राडा

*
ाणी बाटल्या व खुर्च्यांची फेकाफेकी, नगरसेवक धावले आयुक्तांवर
उल्हासनगर - पाणीप्रश्नी महासभेत गुरुवारी पुन्हा राडा झाला असून पाणी बाटल्या व खुर्च्यांची फेकाफेकी नगरसेवकांनी करून आयुक्तांकडे धाव घेतली. आयुक्तांच्या मदतीला अधिकारीवर्ग धावल्याने सभागृहात अधिकार्‍यांविरोधात नगरसेवक असा सामना रंगला होता.
उल्हासनगरात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा प्रश्न बहुतांश नगरसेवकांनी महासभेत आणल्याने बुधावारच्या महासभेत राडा होऊन महासभा स्थगित करण्याचा निर्णय महापौरांना घ्यावा लागला होता. पाणीप्रश्नी नगरसेवक रमेश चव्हाण, अंकुश म्हस्के, राजेश वानखडे, सुभाष मनसुलकर, सुरेश जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेत नियमित पाणीपुरवठ्याची मागणी केली.
पाणीप्रश्नी चर्चा भरपूर झाली. दोन दिवसांत पाणीपुरवठा नियमित होणार असल्याचे आश्वासन आयुक्त बालाजी खतगावकर यांनी दिल्यावरही सुभाष मनसुलकर, रमेश चव्हाण यांच्यासह इतर हजर होते. आयुक्तांनी नगरसेवकांना उद्देशून स्टंटबाजी करू नका, असे बोलताच या नगरसेवकांनी पाण्याच्या बाटल्या व खुर्च्यांची फेकाफेक करून आयुक्तांकडे धाव घेतली. आयुक्त हाय हाय... अशा घोषणा देऊन माफीची मागणी केली. त्या वेळी आयुक्तांच्या मदतीला अधिकारीवर्ग धावल्याने पुढील अनर्थ टळला.
साई पक्षाचे जीवन इदनानी, जया साधवानी, बी.बी. मोरे, शहर अभियंता रमेश शिर्के, युवराज भदाळे आदींनी समजंस भूमिका घेतल्याने वातावरण निवळून पाणी महासभा २६ ऑगस्ट रोजी घेण्याचे ठरले.
अवैध बांधकामांत नगरसेवकच सहभागी असल्याचा आरोप नगरसेवकांनी केल्याने आयुक्त बालाजी खतगावकर यांनी तसा प्रस्ताव संमत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच एलबीटी उत्पन्नाचा विषयही गाजला असून तो पुढच्या महासभेत घेण्याचे ठरले आहे. अवैध बांधकाम प्रकरणी एक ठरावही संमत करून पाडकाम कारवाई झाली. एका पथकाची स्थापना आयुक्तांनी केली आहे.
(प्रतिनिधी / सदानंद नाईक)

वाचली -नारायण जाधव

Web Title: Ulhasnagar reopens on water dispute in the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.