Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्वर्ण जयंती स्वरोजगार योजनेच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार

स्वर्ण जयंती स्वरोजगार योजनेच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार

मोबाईल, एसएमएस, ई-मेलव्दारे कोट्यवधी रूपयांचे बक्षीस लागल्याचे सांगून हजारो रूपयांची फसवणूक करण्याची अनेक प्रकरणे ऐकण्यात आली आहेत.

By admin | Updated: June 27, 2015 04:34 IST2015-06-27T00:10:42+5:302015-06-27T04:34:09+5:30

मोबाईल, एसएमएस, ई-मेलव्दारे कोट्यवधी रूपयांचे बक्षीस लागल्याचे सांगून हजारो रूपयांची फसवणूक करण्याची अनेक प्रकरणे ऐकण्यात आली आहेत.

Types of cheating in the name of Swarna Jayanti Swarozgar Yojana | स्वर्ण जयंती स्वरोजगार योजनेच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार

स्वर्ण जयंती स्वरोजगार योजनेच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार

पुणे : मोबाईल, एसएमएस, ई-मेलव्दारे कोट्यवधी रूपयांचे बक्षीस लागल्याचे सांगून हजारो रूपयांची फसवणूक करण्याची अनेक प्रकरणे ऐकण्यात आली आहेत. आता चक्क भारत सरकारच्या नावेच फसवणूक केली जात असल्याचे प्रकरण समोर आले आहे. केंद्राकडून चालविण्यात येणाऱ्या स्वर्ण जयंती स्वरोजगार योजनेच्या माध्यमातून नोकरी लागल्याचे सांगून, ती नोकरी मिळविण्यासाठी काही हजार रूपये भरण्याच्या नावाने फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या फसवणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव छायाचित्राचाही वापर करण्यात आला आहे.
आॅनलाईन, ई-मेलद्वारे फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश ‘लोकमत’ने केला होता. यासंदर्भातील वृत्त २४ जूनला ‘आॅनलाईन टोळयांकडून हजारोंचा गंडा’ या शीषर्काखाली प्रसिध्द करण्यात आले होते. त्यानंतर फसवणूक झालेल्या आणि असे ईमेल आलेल्यांचे दूरध्वनी ‘लोकमत’कडे येत होते. अशाच ‘लोकमत’चा वाचक असलेला गणेश खमितकर या विद्यार्थ्यांची झालेली फसवणूक त्याने समोर आणली.
एमबीए करीत असलेल्या गणेशला दि. २२ जूनला स्पीड पोस्टाने पाकिट आले. त्यावर त्याचे नाव, पूर्ण पत्ता आणि मोबाईल क्रमांकही लिहिण्यात आला होता. त्याने पाकिट उघडले असता त्यात भारत सरकारच्या स्वर्ण जयंती स्वरोजगार योजनेच्या लेटरहेडवरील त्याच्या नावाचे पत्र त्याला मिळाले. या पत्रात त्याला या योजनेअंतर्गत ग्राहक सेवा प्रतिनिधी पदासाठी त्याची निवड झाल्याचे सांगण्यात आले.
या पदाच्या नियुक्तीसाठी त्याला दर महिन्याला ३० हजार ५०० रूपये पगार मिळणार असल्याचेही म्हटले होते. त्याचबरोबर या नियुक्तीसाठी १० हजार ८०० रूपये भरावे लागणार असल्याचेही पत्रात सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Types of cheating in the name of Swarna Jayanti Swarozgar Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.