मुंबई : नोटाबंदीमुळे दुचाकी विक्रीचा दर २ अंकांवरून कमी झाल्याने चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस देशातील दुचाकी विक्रीमध्ये ७ ते ८ टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इक्रा या संस्थेने दुचाकी विक्रीबाबतचा एक अहवाल जाहीर केला असून, त्यामध्ये हे स्पष्ट झाले आहे.
नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर देशातील दुचाकी विक्रीला त्याचा मोठा फटका बसला तोपर्यंत दुचाकी विक्रीचा वृद्धी दर २ अंकात होता. मात्र नोव्हेंबर ते जानेवारी या काळामध्ये त्यात ११.३ टक्क्यांनी घट झालेली दिसून आली. आता चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात दुचाकी विक्री जोर पकडण्याची शक्यता असून, त्यामुळेच या उद्योगाच्या वाढीचा वार्षिक दर ७ ते ८ टक्के राहण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
चालू आर्थिक वर्षात देशात स्कूटरची विक्री वाढत असून, ती मोटार सायकलपेक्षा बरीच जास्त राहण्याची शक्यता आहे. आतापर्यंत स्कूटरच्या विक्रीमध्ये १२.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत वाढीचा हा दर १४.७ टक्के एवढा राहिला. मोटारसायकलच्या विक्रीमधील वाढ अवघी ५.१ टक्क्यांवर आली आहे. सन २०१३ पासून मोटारसायकलच्या विक्रीमध्ये फारशी वाढ होताना दिसत नाही.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या १० महिन्यात दुचाकी उद्योगाच्या वाढीचा दर ८.३ टक्के एवढा राहिला आहे. गेल्या ४ आर्थिक वर्षांपेक्षा वाढीचा हा दर अधिक चांगला असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
दुचाकी विक्रीमध्ये होणार आठ टक्के वाढ
नोटाबंदीमुळे दुचाकी विक्रीचा दर २ अंकांवरून कमी झाल्याने चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस देशातील दुचाकी विक्रीमध्ये ७ ते ८ टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे
By admin | Updated: March 14, 2017 00:02 IST2017-03-14T00:02:34+5:302017-03-14T00:02:34+5:30
नोटाबंदीमुळे दुचाकी विक्रीचा दर २ अंकांवरून कमी झाल्याने चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस देशातील दुचाकी विक्रीमध्ये ७ ते ८ टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे
