नवी दिल्ली : वाढते प्रदूषण रोखण्यासाठी गुरुवारी सरकारने एक मोठे पाऊल उलचत सीएनजीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनांचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला. तेल आणि नैसर्गिक गॅसमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी देशात सरकार स्वच्छ इंधन पुरविण्याच्या दृष्टीने गंभीर प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
इंद्रप्रस्थ गॅस लि. (आयजीएल) आणि गेल इंडिया लि. (जीआयएल) यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर आणि नवी दिल्लीच्या खासदार मीनाक्षी लेखी याही उपस्थित होत्या. सध्या देशात खपल्या जाणाऱ्या एकूण इंधनात केवळ ७ टक्के इंधनात गॅसचा वापर होतो. संपूर्ण जगात हे प्रमाण २४ टक्के आहे. सीएनजीवर दुचाकी वाहन चालविण्याचा हा प्रयोग ‘ऐतिहासिक’ असल्याचे सांगून प्रधान म्हणाले की, यातून मिळणाऱ्या अनुभवाच्या आधारे त्याची वेगाने अंमलबजावणी केली जाईल. प्रारंभ राजधानीत करण्यात आल्याने दिल्ली स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेस चालना मिळेल. यावेळी प्रकाश जावडेकर म्हणाले की, प्रदूषण नियंत्रित करण्यास सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्याचे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी २०२० पर्यंत युरो-६ इंधन प्राप्त केले जाईल. स्वच्छ इंधनाला चालना देण्यासाठी आपले मंत्रालय पूर्ण सहकार्य करील. स्वच्छ इंधनाला चालना देण्याच्या उद्देशानेच ई-रिक्षाची सुरुवात करण्यात आली आहे. शिवाय इलेक्ट्रिक व हायब्रीड कारवर सबसिडी देण्यात आली
आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सीएनजीवर धावणार दुचाकी
वाढते प्रदूषण रोखण्यासाठी गुरुवारी सरकारने एक मोठे पाऊल उलचत सीएनजीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनांचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला.
By admin | Updated: June 24, 2016 00:53 IST2016-06-24T00:53:51+5:302016-06-24T00:53:51+5:30
वाढते प्रदूषण रोखण्यासाठी गुरुवारी सरकारने एक मोठे पाऊल उलचत सीएनजीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनांचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला.
