Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सचा दोन आठवड्यांतील उच्चांक

सेन्सेक्सचा दोन आठवड्यांतील उच्चांक

चढ-उतारावर हिंदोळे घेत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसअखेर दोन आठवड्यांतील उच्चांक गाठत २५,९१८.९५ वर स्थिरावला

By admin | Updated: August 14, 2014 03:56 IST2014-08-14T03:56:52+5:302014-08-14T03:56:52+5:30

चढ-उतारावर हिंदोळे घेत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसअखेर दोन आठवड्यांतील उच्चांक गाठत २५,९१८.९५ वर स्थिरावला

The two-week highs of the Sensex | सेन्सेक्सचा दोन आठवड्यांतील उच्चांक

सेन्सेक्सचा दोन आठवड्यांतील उच्चांक

मुंबई : चढ-उतारावर हिंदोळे घेत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसअखेर दोन आठवड्यांतील उच्चांक गाठत २५,९१८.९५ वर स्थिरावला. बुधवारच्या सत्रात निर्देशांक ३८.१८ अंकांनी वधारला. किरकोळ महागाईचा वाढता जोर आणि औद्योगिक उत्पादन घटल्याकडे दुर्लक्ष करीत गुंतवणूकदारांनी बड्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी केल्याने बाजाराला उभारी मिळाली.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही (निफ्टी) १२.५० अंकांनी वधारत ७,७३९.५५ वर स्थिरावला.
बीएसई-निर्देशांकातील एफएमसीजी कंपन्या, तसेच आयटीसी आणि हिंदुस्थान युनिलिव्हर सर्वाधिक फायद्यात राहिली. चढ-उताराच्या खेळात बाजारात बराच वेळ नकारात्मक वातावरण होते. तथापि, एचडीएफसी, सनफार्मा आणि टीसीएससह बड्या कं पन्यांच्या शेअर्सच्या खरेदीमुळे सरतेशेवटी बाजाराला उभारी आली.
लार्सन अँड टुब्रो, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, भेल, हिंदाल्को, कोल इंडिया, टाटा स्टील, टाटा पॉवर आणि स्पिलाचे शेअर्स विकून गुंतवणूकदारांनी नफा पदरात पाडून घेतल्याने निर्देशांकाला मोठी झेप घेता आली नाही.
सिंगापूर वगळता आशियातील अन्य सर्व बाजारात तेजी होती. युरोपीय बाजाराची सुरुवातही संमिश्र होती.

Web Title: The two-week highs of the Sensex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.