Lokmat Money > बिझनेस न्यूज > दोन हजार कोटींचा हवाला घोटाळा?

दोन हजार कोटींचा हवाला घोटाळा?

सामान्य व्यक्तींच्या खात्यातून विदेशात पैसे हस्तांतरीत करणारे एक मोठे रॅकेट असल्याचा दावा डीआरआयने (महसूल गुप्तचर संचालनालय) केला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2016 04:55 IST2016-08-30T04:55:00+5:302016-08-30T04:55:00+5:30

सामान्य व्यक्तींच्या खात्यातून विदेशात पैसे हस्तांतरीत करणारे एक मोठे रॅकेट असल्याचा दावा डीआरआयने (महसूल गुप्तचर संचालनालय) केला आहे.

Two thousand crores scam scam? | दोन हजार कोटींचा हवाला घोटाळा?

दोन हजार कोटींचा हवाला घोटाळा?

मुंबई : सामान्य व्यक्तींच्या खात्यातून विदेशात पैसे हस्तांतरीत करणारे एक मोठे रॅकेट असल्याचा दावा डीआरआयने (महसूल गुप्तचर संचालनालय) केला आहे. अगदी उल्हासनगरच्या सिनेमा हॉलमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या नावाने मोठी रक्कम विदेशात हस्तांतरीत करण्यात आली आहे.
डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घोटाळ्याची व्याप्ती २००० कोटी रुपयांपर्यंत असू शकते. यात चार राष्ट्रीयकृत आणि एका खासगी बँकेचा सहभाग आहे. गतवर्षीच्या आॅक्टोबर ते मार्च २०१६ पर्यंतचे हे व्यवहार आहेत. दक्षिण मुंबईतील बँकामधून हे व्यवहार झाले आहेत. अतिशय सामान्य व्यक्तींच्या नावाने हे व्यवहार झाले आहेत हे विशेष. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास उल्हासनगरमध्ये काम करणाऱ्या एका सिनेमा गृहातील कामगाराच्या नावाने बँकेत खाते उघडण्यात आले आणि विदेशातील एका कंपनीसाठी चक्क ४०० कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले. एका रेल्वे स्टेशनवर काम करणाऱ्या तिकीट चेकरच्या नावाने खाते उघडण्यात आले. एवढेच काय घाटकोपरच्या एका भेळपुरीवाल्याचे खाते उघडून तब्बल ६०० कोटी रुपयांची रक्कम देशाबाहेर हस्तांतरीत करण्यात आली. 

Web Title: Two thousand crores scam scam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.