Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > विमान तिकिटावर लावणार दोन टक्के अधिभार

विमान तिकिटावर लावणार दोन टक्के अधिभार

नव्या नागरी उड्डयन धोरणातहत विमान प्रवास तिकिटावर दोन टक्के अधिभार लावण्याचा सरकारचा विचार असल्याने हवाई सफर करणाऱ्यांना विमान प्रवासासाठी अधिक

By admin | Updated: August 28, 2015 03:21 IST2015-08-28T03:21:08+5:302015-08-28T03:21:08+5:30

नव्या नागरी उड्डयन धोरणातहत विमान प्रवास तिकिटावर दोन टक्के अधिभार लावण्याचा सरकारचा विचार असल्याने हवाई सफर करणाऱ्यांना विमान प्रवासासाठी अधिक

Two percent surcharge will be imposed on the airline | विमान तिकिटावर लावणार दोन टक्के अधिभार

विमान तिकिटावर लावणार दोन टक्के अधिभार

नवी दिल्ली : नव्या नागरी उड्डयन धोरणातहत विमान प्रवास तिकिटावर दोन टक्के अधिभार लावण्याचा सरकारचा विचार असल्याने हवाई सफर करणाऱ्यांना विमान प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागतील.
या अधिभारातून मिळणाऱ्या पैशाचा वापर विभागीय आणि दुर्गम भागात विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी केला जाईल.
नागरी उड्डयन मंत्रालय विमान तिकिटावर दोन टक्के अधिभार लावण्याचा विचार करीत आहे. नवीन प्रस्तावित धोरणातहत ईशान्येकडील दुर्गम भागात हवाई संपर्क वाढविण्याची शक्यता पडताळून पाहिली जाणार आहे. तसेच देशांतर्गत आणि विदेशी कंपन्यांसाठी विदेशी सेवेसंबंधीच्या नियमात बदल करण्याच्या विविध पर्यायांवरही सरकार विचार करीत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Two percent surcharge will be imposed on the airline