Lokmat Money > बिझनेस न्यूज > दुचाकीच्या धडकेत दोन ठार

दुचाकीच्या धडकेत दोन ठार

शेवगाव (जि. अहमदनगर) : शेवगाव-नगर रस्त्यावरील अमरापूर येथे दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झालेल्या अपघातात दोन जण ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. मरण पावलेले दोघेही मोटारसायकल चालवित होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:45+5:302014-10-04T22:55:45+5:30

शेवगाव (जि. अहमदनगर) : शेवगाव-नगर रस्त्यावरील अमरापूर येथे दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झालेल्या अपघातात दोन जण ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. मरण पावलेले दोघेही मोटारसायकल चालवित होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Two killed in a wheelchair | दुचाकीच्या धडकेत दोन ठार

दुचाकीच्या धडकेत दोन ठार

वगाव (जि. अहमदनगर) : शेवगाव-नगर रस्त्यावरील अमरापूर येथे दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झालेल्या अपघातात दोन जण ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. मरण पावलेले दोघेही मोटारसायकल चालवित होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
शुक्रवारी विजयादशमीच्या दिवशी रात्री ९ च्या सुमारास पैठण तालुक्यातील दादेगाव जहागीर येथील कृष्णा रतन घोडके हे सचिन शरद घोडके व लखन शरद घोडके यांच्यासह मोटारसायकलवरून मोहटादेवीकडे दर्शनाकरिता निघाले होते. त्याचवेळी कैलास बाबुराव धोत्रे (रा. शेवगाव) हे राहुल नामदेव म्हस्के (रा. पवारवस्ती, शेवगाव) यांच्यासोबत मोटारसायकलवरून शेवगावकडे येत होते. दोन्ही मोटारसायकलची अमरापूर येथील शिवपार्वती पेट्रोल पंपासमोर धडक झाली. त्यात कृष्णा रतन घोडके (२०) व कैलास बाबुराव धोत्रे (२७) हे दोघे जागीच ठार झाले असून, अन्य तीन जण जबर जखमी झाले. जखमींवर नगरमध्ये उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Two killed in a wheelchair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.