कमाळा : केशरी शिधापत्रिका धारकांना मिळणारे स्वस्त धान्य गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे त्यामुळे करमाळा तालुक्यातील १६ हजार ७५० केशरी शिधापत्रिकाधारक शासनाकडून मिळणार्या स्वस्त धान्यापासून वंचित आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असूनही जिल्हा पुरवठा विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नाही त्यामुळे शिधापत्रिका धारकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. करमाळा तालुक्यात २ लाख ७७ हजार ४४८ एवढ्या लोकसंख्येसाठी एकूण ८६ हजार १०३ शिधापत्रिकाधारक आहेत त्यामध्ये अन्नपूर्णा ९८,अंत्योदय ५ हजार ६५४ तर अन्नसुरक्षा २० हजार ६०७,अन्नसुरक्षा पात्र १२ हजार ९८५ उर्वरित केशरी शिधापत्रिका १६ हजार ७५० तर शुभ्र शिधापत्रिकाधारक ४९ हजार ३८ एवढी संख्या आहे.तालुक्यात एकूण १२५ पैकी ११२ स्वस्त धान्य दुकानामार्फत अन्नधान्याचे वितरण केले जाते.अन्नसुरक्षा,अंत्योदय,बीपीएल योजनेचा लाभ मिळविणार्या शिधापत्रिकाधारक व्यतिरिक्त जास्त उत्पन्न असलेले नोकरदार व केशरी कार्डधारक स्वस्त धान्यापासून वंचित आहेत. अन्नसुरक्षा योजनेंतर्गत माणसी तीन किलो गहू,दोन किलो तांदूळ असे धान्य शासनाकडून शिधापत्रिकाधारकांना अल्पदरात वाटप करण्यात येते तर अन्नसुरक्षा योजनेतील एपीएल शिधापत्रिकाधारकांना चार किलो गहू व पाच किलो तांदूळ असे धान्य वाटप केले जाते; मात्र गेल्या तीन महिन्यांपासून इतर योजनेतील लाभधारकांना धान्य वाटप करण्यात येत असले तरी एपीएल शिधापत्रिकाधारकांना मात्र धान्यच मिळत नसल्याने ते शासनाच्या स्वस्त धान्यापासून वंचित आहेत. ते शिधापत्रिकाधारक गेल्या तीन महिन्यांपासून संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे धान्यासाठी हेलपाटे मारीत आहेत; मात्र तुमच्या हिश्श्याचे धान्य वरून आलेले नाही असे उत्तर दिले जात आहे. बंद झालेले धान्य कधी मिळेल हे कोणी सांगत नाही. मागील तीन महिन्यांचे धान्य एकदम वितरित केले जाईल का याबाबतही धान्य दुकानदारांना काहीच माहिती नाही यामुळे शिधापत्रिकाधारकांची मोठी पंचायत झाली आहे.कोट करणे.केशरी शिधापत्रिकाधारकांना वरूनच धान्य आलेले नाही;मात्र बीपीएल,अंत्योदय,अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थीर्ंना वेळच्या वेळी धान्य मिळत आहे, असे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी सांगितले.कोट करणे.केंद्रात व राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर आम आदमीला वाटले होते की आता आमच्या वाट्याला चांगले दिवस येणार; मात्र आमच्या पदरी निराशाच पडली आहे असे केसरी शिधापत्रिकाधारक मारुती शिंदे यांनी सांगितले.
करमाळ्यात स्वस्त धान्य बंद
करमाळा : केशरी शिधापत्रिका धारकांना मिळणारे स्वस्त धान्य गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे त्यामुळे करमाळा तालुक्यातील १६ हजार ७५० केशरी शिधापत्रिकाधारक शासनाकडून मिळणार्या स्वस्त धान्यापासून वंचित आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असूनही जिल्हा पुरवठा विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नाही त्यामुळे शिधापत्रिका धारकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:37+5:302015-01-31T00:34:37+5:30
करमाळा : केशरी शिधापत्रिका धारकांना मिळणारे स्वस्त धान्य गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे त्यामुळे करमाळा तालुक्यातील १६ हजार ७५० केशरी शिधापत्रिकाधारक शासनाकडून मिळणार्या स्वस्त धान्यापासून वंचित आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असूनही जिल्हा पुरवठा विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नाही त्यामुळे शिधापत्रिका धारकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
