Lokmat Money > बिझनेस न्यूज > जेटलींच्या वक्तव्यावरून रहाटकर अडचणीत

जेटलींच्या वक्तव्यावरून रहाटकर अडचणीत

नाशिक : केंद्रीय परराष्ट्रमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीतील निर्भया प्रकरण क्षुल्लक असल्याच्या केलेल्या विधानावरून भाजपा महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर अडचणीत आल्या. हा विषय संपला आहे, असे सांगून त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST2014-08-25T21:40:39+5:302014-08-25T21:40:39+5:30

नाशिक : केंद्रीय परराष्ट्रमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीतील निर्भया प्रकरण क्षुल्लक असल्याच्या केलेल्या विधानावरून भाजपा महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर अडचणीत आल्या. हा विषय संपला आहे, असे सांगून त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

Troubled by Jaitley's remarks | जेटलींच्या वक्तव्यावरून रहाटकर अडचणीत

जेटलींच्या वक्तव्यावरून रहाटकर अडचणीत

शिक : केंद्रीय परराष्ट्रमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीतील निर्भया प्रकरण क्षुल्लक असल्याच्या केलेल्या विधानावरून भाजपा महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर अडचणीत आल्या. हा विषय संपला आहे, असे सांगून त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच नाशिकमध्ये आलेल्या रहाटकर यांना भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात पत्रकारांशी वार्तालाप करताना या अडचणीला सामोरे जावे लागले. अरुण जेटली यांनी अलीकडेच एका पर्यटनविषयक कार्यक्रमात बोलताना दिल्लीतील क्षुल्लक बलात्काराच्या निर्भया प्रकरणाला मोठी प्रसिद्धी मिळाल्याने पर्यटनावर प्रतिकूल परिणाम झाल्याचा दावा केला होता. भाजपात महिलांना सन्मानाने वागवले जाते तसेच महिलांची सुरक्षितता हा भाजपाच्या चिंतेचा विषय असल्याचा दावा करणार्‍या रहाटकर यांना जेटली यांच्या या वक्तव्याविषयी विचारल्यांनतर जेटली यांनी महिलांचा आपण सन्मान करतो आहे असा खुलासा केल्याचे सांगून आता हा विषय संपल्याचा दावा करीत अधिक बोलणे टाळले.
दरम्यान, महिलांचे आरक्षण, सन्मान आणि सुरक्षितता या विषयावर भाजपा गंभीर आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे यासाठी भाजपाने यापूर्वीही प्रयत्न केले होते याचे स्मरण करून देताना त्यांनी बूथ कमिट्यांवर महिला कार्यकर्त्यांची नेमणूक केली आहेच. येत्या विधानसभा निवडणुकीत क्षमता असलेल्या महिला कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले जातील, असे नमूद केले. महायुतीत भाजपाच्या वाटेला येणार्‍या जागांपैकी ३३ टक्के उमेदवारी महिलांना देणार काय, या विषयावर रहाटकर यांनी संख्येवर जाऊ नका, निवडून येण्याची क्षमता असलेल्या जास्तीत जास्त महिलांना संधी दिली जाईल, असे सांगितले. यावेळी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, प्रदेश चिटणीस सीमा हिरे, माजी महापौर बाळासाहेब सानप, माजी उपमहापौर देवयानी फरांदे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष पुष्पा शर्मा यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते.
फोटो २५पीएचएयू १००

Web Title: Troubled by Jaitley's remarks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.