नाशिक : पक्षादेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा सदस्यांना अपात्र ठरविण्याबाबतची कार्यवाही प्रलंबित असतानाच अलीकडे करण्यात आलेल्या पाहणीत त्र्यंबकेश्वर नगरपरिषद हद्दीत असलेल्या एक हजाराहून अधिक अतिक्रमणांमध्ये अकरा नगरसेवकांचेच अतिक्रमण असल्याचे उघडकीस आल्याने त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकार्यांनी मागविला असून, यात नगरसेवकांचे अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाल्यास नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत.
मुंबई महापालिकेत दाखल असलेल्या एका याचिकेचा आधार घेऊन जिल्हा प्रशासनाने त्र्यंबकेश्वर येथील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला असून, सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण दूर केल्यास कुंभमेळ्यानिमित्त होणार्या गर्दीचे नियोजन करणे अधिक सोपे होणार असल्याचा त्यामागचा हेतू आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देऊन दोन दिवसांपासून मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्र्यंबक नगरपरिषदेने दिलेल्या माहितीनुसार शहरात १०५० कच्चे व पक्केस्वरूपाचे अतिक्रमण असून, त्यात सर्वपक्षीय अकरा नगरसेवकांनीच अतिक्रमण केल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यात धनंजय तुंगार, माधुरी जोशी, ला, रवींद्र सोनवणे, शिरसाठ, अडसरे आदिंचा समावेश आहे. या सर्वांचे अतिक्रमण या मोहिमेत काढण्यात येणार असून, त्र्यंबक शहरात अतिक्रमण नाही असा अहवाल नगरपरिषदेने सादर करावा अशा सूचना जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी मुख्याधिकार्यांना दिल्या आहेत.
दरम्यान, या संदर्भात पत्रकारांशी बोलताना कुशवाह यांनी, त्र्यंबक नगरपरिषदेच्या अतिक्रमण मोहिमेविषयी नगरपरिषदेकडून अहवाल मागविला असून, एकही अतिक्रमण शहरात असू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे, असे आवाहन करून या अतिक्रमणात नगरसेवकांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्यास कायदेशीर मार्गाने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची कार्यवाही केली जाईल.
चौकट===
आज सुनावणी
त्र्यंबक नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारून विरोधी उमेदवाराला मतदान केल्याच्या कारणावरून चार नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत जिल्हाधिकार्यांकडे दीड वर्षांपूर्वी अपील दाखल करण्यात आले असून, त्याची सुनावणी शुक्रवारी ठेवण्यात आली आहे. या अपिलाच्या सुनावणीवर जूनमध्ये होणार्या नगराध्यक्ष निवडणुकीवर परिणाम होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
चौकट===
...तर नगरपरिषद बरखास्त
त्र्यंबकच्या अतिक्रमण मोहिमेत नगरसेवकांचे अतिक्रमण आढळून आल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. अगोदरच पाच नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रश्न प्रलंबित असताना त्यात पुन्हा अकरा नगरसेवकांची भर पडल्यास शासनासमोर नगरपरिषद बरखास्त करण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
त्र्यंबकेश्वरच्या नगरसेवकांचेच अतिक्रमण अहवाल मागविला : अपात्रतेची टांगती तलवार
नाशिक : पक्षादेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा सदस्यांना अपात्र ठरविण्याबाबतची कार्यवाही प्रलंबित असतानाच अलीकडे करण्यात आलेल्या पाहणीत त्र्यंबकेश्वर नगरपरिषद हद्दीत असलेल्या एक हजाराहून अधिक अतिक्रमणांमध्ये अकरा नगरसेवकांचेच अतिक्रमण असल्याचे उघडकीस आल्याने त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकार्यांनी मागविला असून, यात नगरसेवकांचे अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाल्यास नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत.
By admin | Updated: May 15, 2015 00:16 IST2015-05-15T00:13:35+5:302015-05-15T00:16:51+5:30