नवी दिल्ली : मागील वर्षीच्या तुलनेत रेल्वेच्या उत्पन्नात ६.६७ टक्के वाढ झाली आहे. तथापि, निर्धारित लक्ष्य प्राप्त करण्यात रेल्वेला यश आलेले नाही. वेतन आयोगामुळे पडणारा संभाव्य भार हेच आता मोठे आव्हान असणार आहे.
रेल्वेचे उत्पन्न १० डिसेंबरपर्यंत ८.८ टक्क्यांनी घटून १,११,८३४ कोटी रुपये झाले आहे. मुळात १,२२,६३९ कोटी रुपयांचे लक्ष्य होते. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, या वर्षात ठरविलेले काही नियोजन आम्ही पूर्णत्वास नेऊ शकलो नाही.
दिल्लीतील एका वस्तीतून अतिक्रमण हटविताना एका मुलाचा मृत्यू झाला होता. याबाबत प्रभू म्हणाले की, सार्वजनिक संपत्तीचा उपयोग जनतेच्या भल्यासाठी केला जातो. यावर खुली चर्चा व्हायला हवी. आम्ही तेथे बंगला बांधू इच्छित नाही, असे सांगत त्यांनी अतिक्रमण हटविण्यामागचा हेतू स्पष्ट केला.
अडथळे पार करत रेल्वे विकासाच्या ट्रॅकवर
मागील वर्षीच्या तुलनेत रेल्वेच्या उत्पन्नात ६.६७ टक्के वाढ झाली आहे. तथापि, निर्धारित लक्ष्य प्राप्त करण्यात रेल्वेला यश आलेले नाही
By admin | Updated: December 23, 2015 02:12 IST2015-12-23T02:07:53+5:302015-12-23T02:12:26+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत रेल्वेच्या उत्पन्नात ६.६७ टक्के वाढ झाली आहे. तथापि, निर्धारित लक्ष्य प्राप्त करण्यात रेल्वेला यश आलेले नाही
