करळमध्ये घडला गुन्हा : आईच्या खुनाप्रकरणी वडील दुबईच्या तुरुंगात...............जयंत धुळप, अलिबाग : जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात नांदवी गावात राहणार्या पाच वर्षांच्या मुलीवर केरळमधील त्रिचूर जिल्ह्यातील थम्मकुडम गावात शारिरीक व मानसिक अत्याचार झाला आहे. याप्रकरणी केरळमधील उषा धनंजयन, निजल धनंजयन आणि रिज्जू या तिघांविरुध्द गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. अत्याचार करणारे हे त्या मुलीचे सख्खे आजी आजोबाच असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुलीचे वडील अतिफ पोपेरे हे मूळचे माणगाव तालुक्यांतील नांदवी गावचे आहेत. नोकरीनिमित्त ते काही वर्षांपूर्वी दुबईला गेले. तिथेच ख्रिश्चन मुलीशी त्यांनी विवाह केला. पिडीत मुलगी तीन वर्षाची असताना आतिफ आणि त्याच्या पत्नीत वाद सुरू झाले आणि त्याने तिचा खून केला. दुबई पोलीसांनी अतिफला अटक केली असून सध्या तो दुबईतल्या तुरुंगातच शिक्षा भोगत आहेत.आईच्या खुनानंतर त्या मुलीचा सांभाळ कुणी करायचा यावरुन वादंग निर्माण झाला. प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले. बालिकेचा सांभाळ नांदवीतील (माणगाव) तिच्या वडिलांची आई फैरोज कमरुद्दीन पोपेरे यांनी करावा, मात्र दिवाऴीच्या सुीत सात दिवस तर उन्हाळी सुीत पंधरा दिवस तिला तिच्या मृत आईचे पिता निजल धनंजयन व उषा धनंजयन यांच्याकडे पाठवण्यात यावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.न्यायालयाच्या आदेशानुसार उषा धनंजयन व निजल धनंजयन यांनी १९ ऑक्टोबरला मुलीला केरळमध्ये नेले व अत्याचार केले. सुी संपल्यावर ती जेव्हा पुन्हा नांदवी येथे आजी फैरोजकडे आली तेव्हा केरळमध्ये आपल्यावर अत्याचार झाल्याचे तिने आजीला सांगितले. त्यानुसार फैरोज कमरुद्दीन पोपेरे यांनी २१ नोव्हेंबर रोजी गोरेगाव पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली.........केरळमधील ठिकाणा शोधला गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक आप्पासाहेब लेंगरे आणि माणगाव पोलीस उप विभागीय अधिकारी अमोल झेंडे-पाटील यांनी मुलीचे केरळमधील आजीआजोबा उषा धनंजयन व निजल धनंजयन यांचा केरळमधील ठावठिकाणा शोधला. त्या दोघांसह रिज्जू अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे घटनास्थळ केरळमध्ये आहे. त्यामुळे आता प्रकरणातील प्राथिमक गुन्हे अहवाल व संबंधीत कागदपत्रे केरळ पोलीसांकडे देण्यात यावीत, की थेट महाराष्ट्र पोलिसांनीच पुढील तपास करावा, या बाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक आप्पासाहेब लेंगरे यांनी दिली.
आजी-आजोबांचे अल्पवयीन मुलीवर अत्याचार
केरळमध्ये घडला गुन्हा : आईच्या खुनाप्रकरणी वडील दुबईच्या तुरुंगात
By admin | Updated: November 22, 2014 23:30 IST2014-11-22T23:30:34+5:302014-11-22T23:30:34+5:30
केरळमध्ये घडला गुन्हा : आईच्या खुनाप्रकरणी वडील दुबईच्या तुरुंगात
