नवी दिल्ली : सलग तेरा महिन्यांपासून कार विक्रीचा गीअर टॉपमध्ये असून नोव्हेंबर महिन्यातही कारच्या विक्रीत १०.३९ टक्के वाढ झाली. तथापि, ग्रामीण भागातून फारसी मागणी नसल्याने वाहन उद्योग चिंतित आहे.
सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) या संघटनेच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर २०१५ मध्ये देशभरात एकूण १ लाख ७३ हजार १११ कार विकल्या गेल्या. आॅक्टोबरमध्ये वाहन विक्रीची आकडा १ लाख ५६ हजार ८११ होता.
प्रवासी वाहनाच्या विक्री या अवधीत ११.४ टक्के वाढ झाली असून, या अवधीत २ लाख ३६ हजार ६६४ वाहने विकली गेली. आॅक्टोबरमध्ये एकूण २,१२,४३७ वाहनांची विक्री झाली होती.
सियामच्या आकडेवारीनुसार मारुती सुझुकी इंडियाच्या विक्रीत १०.५७ टक्के वाढ झाली. या अवधीत या कंपनीच्या १,१०,५९९ प्रवासी वाहने विकली गेली. तसेच कारच्या विक्री ८.७१ टक्क्यांनी वाढ झाली. या अवधीत या कंपनीच्या ८९.४७९ कार विकल्या गेल्या.
ह्युंदाई मोटार इंडियाच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत नोव्हेंबरमध्ये २२.९२ टक्के वाढली असून, या अवधीत या कंपनीची ४३,६५१ वाहने विकली गेली. एसयूव्ही क्रेटाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
होंडा कार्सच्या १४,२७६ कार विकल्या गेल्या. तसेच टाटा मोटर्सच्या कार विक्रीतही १०.८३ टक्के वाढ झाली असून नोव्हेंबरमध्ये टाटाच्या ९,१७२ कार विकल्या गेल्या.
महिंद्रा-महिंद्राच्या विक्रीतही ३२.२७ टक्के वाढ झाली. या अवधीत महिंद्राची १८,६८६ वाहने विकली गेली.
सियामच्या आकडेवारीनुसार मोटारसायकलींच्या विक्रीत या अवधीत १.५८ टक्के वाढ झाली. या अवधीत ८,६६,७०५ मोटारसायकली विकल्या गेल्या.
बजाज आॅटोच्या मोटारसायकलींच्या विक्रीत १९.५९ टक्के वाढ झाली, तर हीरो मोटोकॉर्पच्या विक्रीत २.९२ टक्के वाढ झाली.
तथापि, होंडा मोटारसायकल अॅण्ड स्कूटर इंडियाच्या विक्रीत २३.८७ टक्के घट झाली. नोव्हेंबरमध्ये स्कूटरच्या विक्रीत २.४५ टक्के वाढ झाली. दुचाकींच्या विक्रीत एकूण १.४७ टक्के वाढ झाली. व्यावसायिक वाहनांची विक्रीही या अवधीत ८.५६ टक्क्यांनी वाढली.
सलग तेराव्या महिन्यात वाहन विक्रीचा टॉप गीअर
सलग तेरा महिन्यांपासून कार विक्रीचा गीअर टॉपमध्ये असून नोव्हेंबर महिन्यातही कारच्या विक्रीत १०.३९ टक्के वाढ झाली.
By admin | Updated: December 11, 2015 23:58 IST2015-12-11T23:58:36+5:302015-12-11T23:58:36+5:30
सलग तेरा महिन्यांपासून कार विक्रीचा गीअर टॉपमध्ये असून नोव्हेंबर महिन्यातही कारच्या विक्रीत १०.३९ टक्के वाढ झाली.
