lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आज ठाण्यात वीज नाही

आज ठाण्यात वीज नाही

ठाणे - महावितरणने देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने मुंब्रा, कळवा-खारेगाव, वागळे इस्टेट या भागांतील वीजपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे.

By admin | Published: August 21, 2014 09:45 PM2014-08-21T21:45:44+5:302014-08-21T21:45:44+5:30

ठाणे - महावितरणने देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने मुंब्रा, कळवा-खारेगाव, वागळे इस्टेट या भागांतील वीजपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे.

Today there is no power in Thane | आज ठाण्यात वीज नाही

आज ठाण्यात वीज नाही

णे - महावितरणने देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने मुंब्रा, कळवा-खारेगाव, वागळे इस्टेट या भागांतील वीजपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे.
या कामामुळे गणपतीपाडा, फुलनगर, ईश्वरनगर, आनंदनगर, वाघोबानगर, भोलानगर, शिवाजीनगर, सम्राट अशोकनगर, ठाकूरपाडा, मफतलाल कॉलनी, शांतीनगर, खारेगाव, मैत्री वाटिका, रेतीबंदर, वास्तुआनंद, रघुकुल सो., ओझोन व्हॅली, अलंकार टॉवर, दत्तवाडी, जुना मुंबई-पुणे रोड, गोविंदधाम सोसायटी, राबोडी, आकाशगंगा परिसर आदी ठिकाणचा वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच जीवनबाग, मुंब्रा स्टेशन, अमृतवाडी, अमृतनगर, सोनाजीनगर, संजयनगर, सम्राटनगर, उदयनगर, झगडे चाळ, आंबेडकरनगर, ठाकूरपाडा, शंकर मंदिर, मेक कंपनी या परिसरातील वीजपुरवठा सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. राय मास्टर एरिया, वर्धमान वाटिका, मानपाडा नाका, कृष्ण टॉवर, वसंत विहार, सिद्धांचल, म्हाडा, पवारनगर, लोकपुरम, लोकउपवन, अशर गांधीनगर, धर्मवीरनगर, सूर्या तुळशीधाम, नीलकंठ पाम या परिसराचा वीजपुरवठा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. वर्तकनगर, भीमनगर, नेहरूनगर, विजयनगर, प्रगती इलेक्ट्रीकल्स, जगदीश इंडस्ट्रीज, यशोधननगर, परेरानगर, डवलेनगर या परिसरांचा वीजपुरवठा सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

Web Title: Today there is no power in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.