ठणे- सेवेतील १० मिनी बसपैकी दोन बसचे बॉडीबिल्डींग परिवहनने चुकीच्या पध्दतीने केल्याचा फटका एका बसला असून आरटीओने त्याला रेड सिग्नल दिल्याची बाब स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली. त्यामुळे या बसचा रस्त्यावर धावण्याचा मार्ग लांबल्याने आता पुन्हा नव्याने परिवहनला ही प्रक्रिया करावी लागणार असून यासाठी पुन्हा लाखोंचा खर्च करावा लागणार आहे.स्टेशनपासून जवळ असलेल्या भागांमध्ये जाण्यासाठी बस उपलब्ध व्हाव्यात म्हणून २०१० मध्ये १० मिनी बसेस घेण्याचा प्रस्ताव परिवहनमध्ये मंजुर केला. त्यानंतर त्यासाठी चेसीज घेतल्या गेल्या. परंतु त्यावर बॉडी बिल्डींग करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लोटला. २०१२ मध्ये हे काम हाती घेण्यात आल्यानंतर या १० मिनी पैकी पाच बस दोन्ही बाजूला दोन सीटर आणि उर्वरित पाच बस एक सीटर या प्रमाणे हे काम सुरु झाले. काम पूर्ण झाल्यावर त्या आरटीओकडे मंजुरीसाठी गेल्या होत्या. पैकी दोन सीटरला आरटीओने परवानगी दिली. परंतु एक सीटरला रेड सिग्नल दिल्याची बाब नगरसेवक नजीब मुल्ला यांनी स्थायी समितीच्या बैठकीत उघड केली. केवळ या बसच्या आतले अंतर हे ३८० मीमी अपेक्षित असतांना ते १२०० मीमी एवढे असल्यानेच रेड सिग्नल मिळाल्याचेही यावेळी उघड झाले. त्यामुळे या पाच बसचे बॉडीबिल्डींगचे काम कोणी केले असा सवाल करुन सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. या बसचे बॉडी बिल्डींगचे काम केल्यानंतर ते बेस्टच्या अधिकार्यांमार्फत पाहणी करुन अंतिम करण्यात आल्याचे परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करुन संबधींत ठेकेदारावर कारवाई करा, अशी मागणी सदस्यांनी केली. दुसरीकडे उर्वरित आठ बस यांचे काय झाले, त्या केव्हा रस्त्यावर धावणार याचे उत्तरही प्रशासनाला देता आले नाही. * परिवहनकडून परस्पर अशा प्रकारचे काम झाल्याने अखेर विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी यापुढे प्रत्येक विभागाच्या कोणत्याही स्वरुपाच्या निविदा मंजूर करतांना त्यांच्या अटी व नियम स्थायी समितीच्या मंजुरीसाठी याव्यात, असा ठराव मांडला त्याला सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी अनुमोदन दिले. सभापती सुधाकर चव्हाण यांनी प्रशासनाने याची तत्काळ अमंलबजावणी करावी, असे आदेश दिले.
टीएमटीच्या मिनी बसला आरटीओने परवानगी नाकारली चुकीच्या बॉडी बिल्डींगमुळे
ठाणे- सेवेतील १० मिनी बसपैकी दोन बसचे बॉडीबिल्डींग परिवहनने चुकीच्या पध्दतीने केल्याचा फटका एका बसला असून आरटीओने त्याला रेड सिग्नल दिल्याची बाब स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली. त्यामुळे या बसचा रस्त्यावर धावण्याचा मार्ग लांबल्याने आता पुन्हा नव्याने परिवहनला ही प्रक्रिया करावी लागणार असून यासाठी पुन्हा लाखोंचा खर्च करावा लागणार आहे.
By admin | Updated: August 26, 2014 21:56 IST2014-08-26T21:56:20+5:302014-08-26T21:56:20+5:30
ठाणे- सेवेतील १० मिनी बसपैकी दोन बसचे बॉडीबिल्डींग परिवहनने चुकीच्या पध्दतीने केल्याचा फटका एका बसला असून आरटीओने त्याला रेड सिग्नल दिल्याची बाब स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली. त्यामुळे या बसचा रस्त्यावर धावण्याचा मार्ग लांबल्याने आता पुन्हा नव्याने परिवहनला ही प्रक्रिया करावी लागणार असून यासाठी पुन्हा लाखोंचा खर्च करावा लागणार आहे.
