Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात गडगडाट; सेन्सेक्स, निफ्टी २0 दिवसांचा नीचांकावर

शेअर बाजारात गडगडाट; सेन्सेक्स, निफ्टी २0 दिवसांचा नीचांकावर

देशी शेअर बाजारात विदेशी भांडवल प्रवाह बदलल्याने आज घसरण नोंदली गेली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी यांनी गुरुवारी २० दिवसांचा तळ गाठला.

By admin | Updated: July 31, 2014 23:33 IST2014-07-31T23:33:26+5:302014-07-31T23:33:26+5:30

देशी शेअर बाजारात विदेशी भांडवल प्रवाह बदलल्याने आज घसरण नोंदली गेली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी यांनी गुरुवारी २० दिवसांचा तळ गाठला.

Thunderstorms in stock markets; Sensex, Nifty below 20-day low | शेअर बाजारात गडगडाट; सेन्सेक्स, निफ्टी २0 दिवसांचा नीचांकावर

शेअर बाजारात गडगडाट; सेन्सेक्स, निफ्टी २0 दिवसांचा नीचांकावर

मुंबई : देशी शेअर बाजारात विदेशी भांडवल प्रवाह बदलल्याने आज घसरण नोंदली गेली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी यांनी गुरुवारी २० दिवसांचा तळ गाठला.
सेन्सेक्स १९२ अंकांनी घसरून पुन्हा एकदा २६ हजाराखाली आला. निफ्टी ७० अंकांच्या आपटीसह ७,७२१.३० अंकांवर राहिला. जुलैच्या डेरिव्हेटिव्हज करारांचा निपटारा आणि अमेरिकी फेडरल रिझर्व्हद्वारा मासिक बाँड खरेदी कार्यक्रमात कपातीच्या घोषणेने बाजार धारणेवर नकारात्मक परिणाम झाला.
ब्रोकर्सनी सांगितले की, ऊर्जा, बँकिंग, टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांच्या शेअरमध्ये नफेखोरी झाल्याचे दिसून आले. चांगल्या तिमाही निकालानंतरही आयसीआयसीआय बँक व मारुती सुझुकीचे शेअर घसरले.
प्रमुख ३० शेअरचा सेन्सेक्स तेजीसह उघडला होता; मात्र नंतर तो २५,८५३.६९ अंकांपर्यंत लुंडकला. अखेरीस तो १९२.४५ अंक किंवा ०.७४ टक्क्यांच्या हानीसह २५,८९४.९७ अंकांवर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्सने २६,११८.८८ अंकांपर्यंत मजल मारली होती.
सेन्सेक्समध्ये ११ जुलैनंतर झालेली ही सर्वाधिक घट आहे. त्या दिवशी सेन्सेक्स ३४८.४० अंकांनी आपटला होता. निफ्टी ७,७११.१५ अंकापर्यंत खाली गेल्यानंतर दिवसअखेरीस ७०.७० अंक वा ०.९० टक्के घसरणीसह दीड आठवड्याची नीचांकी पातळी ७,७२१.३० अंकांवर बंद झाला. निफ्टीमध्ये जुलैनंतर ही सर्वांत मोठी घसरण नोंदली गेली. त्या दिवशी निफ्टी १०८.१५ अंकांनी घसरला होता.
एचडीएफसी, आयटीसी, टाटा मोटर्स, एमअ‍ॅण्डएम, टीसीएस, हिंदुस्तान युनिलीव्हर, विप्रो, मारुती सुझुकी व भेल यांचे शेअर आपटल्याने बाजार खाली आला. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने काल आपल्या मासिक बाँड खरेदी कार्यक्रमात १० अब्ज डॉलरची कपात करण्याची घोषणा केली. यामुळे बाजारातील भांडवल प्रवाह सुस्त पडण्याची धारणा निर्माण झाली. आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून आला. जपान, दक्षिण कोरिया आणि तैवानच्या बाजारात घसरण राहिली, तर चीन, हाँगकाँग व सिंगापूरच्या बाजारात तेजी नोंदली गेली.(प्रतिनिधी)

Web Title: Thunderstorms in stock markets; Sensex, Nifty below 20-day low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.