मुंबई : मंगळवारच्या घसरणीनंतर आज भारतीय शेअर बाजार तीन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर घसरले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७८.६४ अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५.२५ अंकांनी खाली आला. आयसीआयसीआय बँक आणि हिंदाल्को यासारख्या ब्ल्यूचिप कंपन्यांचे समभाग कोसळल्याने सेन्सेक्सला फटका बसला.
निफ्टी ८,१0२.१0 अंकांवर बंद झाला. १७ डिसेंबर २0१४ नंतरची ही सर्वांत खालची पातळी ठरली आहे. बीएसई सेन्सेक्स सकाळी स्थिर होता. नंतर मात्र तो जवळपास २७५ अंकांनी खालीवर होत राहिला. सत्रअखेरीस तो २६,९0८.८२ अंकांवर बंद झाला. ७८.६४ अंकांची अथवा 0.२९ टक्क्याची घसरण त्याने नोंदविली. काल सेन्सेक्स ८५४.८६ अंकांनी अथवा ३.0७ टक्क्याने घसरला होता. ही साडेपाच वर्षांतील सर्वांत मोठी घसरण ठरली होती. सीएनएक्स निफ्टी २५.२५ अंकांनी अथवा 0.३१ टक्क्याने घसरून ८,१0२.१0 अंकांवर बंद झाला. त्या आधी तो ८,0६५.४५ अंकांपर्यंत घसरला होता. आशियाई बाजारात तेजीचा कल दिसून आला. चीन, हाँगकाँग, जपान, तैवान, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया येथील बाजार 0.0१ टक्का ते 0.८३ टक्का वाढले. युरोपातील फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन येथील बाजार तेजीत होते.
चालले होते.
प्रतिकूल परिस्थितही समभाग वाढणाऱ्या कंपन्यांत एचयूएल, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, ओएनजीसी, मारुती-सुझुकी आणि एमअँडएम या कंपन्यांचा समावेश आहे.
बाजाराची एकूण व्याप्ती नकारात्मक राहिली. १,५0६ कंपन्यांचे समभाग घसरले. १,३३९ कंपन्यांचे समभाग वाढले. १0७ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल ३,२१0.३५ कोटी रुपये झाली. काल ती ३,१३९.१५ कोटी रुपये होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
४सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 कंपन्यांपैकी १७ कंपन्यांचे समभाग घसरले. उरलेल्या १३ कंपन्यांचे समभाग वाढले. घसरणीचा फटका बसलेल्या बड्या कंपन्यांत हिंदाल्को, आयसीआयसीआय, गेल इंडिया, भेल, आयटीसी, टाटा स्टील आणि टाटा पॉवर यांचा समावेश आहे. टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प आणि कोल इंडिया या कंपन्यांनाही सौम्य फटका बसला.
भारतीय शेअर बाजारांचा तीन आठवड्यांचा नीचांक
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७८.६४ अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५.२५ अंकांनी खाली आला.
By admin | Updated: January 7, 2015 23:38 IST2015-01-07T23:38:57+5:302015-01-07T23:38:57+5:30
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७८.६४ अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५.२५ अंकांनी खाली आला.
