Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुदतीनंतर तीन दिवसांनी दंड

मुदतीनंतर तीन दिवसांनी दंड

क्रेडिट कार्डावरील थकबाकी चुकती करण्यासाठी ठरलेली मुदत संपून तीन दिवस उलटल्यानंतरही कार्डधारकाने पैसे भरले नाहीत तरच बँकांनी अशा थकबाकीवर दंड आकारणी करावी,

By admin | Updated: July 18, 2015 03:55 IST2015-07-18T03:55:01+5:302015-07-18T03:55:01+5:30

क्रेडिट कार्डावरील थकबाकी चुकती करण्यासाठी ठरलेली मुदत संपून तीन दिवस उलटल्यानंतरही कार्डधारकाने पैसे भरले नाहीत तरच बँकांनी अशा थकबाकीवर दंड आकारणी करावी,

Three days after the deadline | मुदतीनंतर तीन दिवसांनी दंड

मुदतीनंतर तीन दिवसांनी दंड

मुंबई : क्रेडिट कार्डावरील थकबाकी चुकती करण्यासाठी ठरलेली मुदत संपून तीन दिवस उलटल्यानंतरही कार्डधारकाने पैसे भरले नाहीत तरच बँकांनी अशा थकबाकीवर दंड आकारणी करावी, असे नवे निर्देश रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत.
बँकेने ग्राहकास क्रेडिट कार्डावरील व्यवहाराचे स्टेटमेंट पाठविल्यापासून ९० दिवसात ते पैसे जमा करणे अपेक्षित असते. आता ही ९० दिवसांची मुदत संपल्यावरही बँकांनी आणखी तीन दिवस वाट पाहावी व तरीही पैसे जमा झाले नाहीत तरच ग्राहकास दंड आकारावा, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
बऱ्याच वेळा ग्राहक मुदतीच्या अगदी शेवटच्या दिवशी पैसे भरतो किंवा ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवितो. परंतु बँक हॉलिडे किंवा अन्य कारणाने ते लगेच त्याच्या खात्यावर जमा केल्याची नोद होत नाही. खासकरून असा परिस्थितीत दंड आकारणी होणाऱ्या क्रेडिट कार्डधारकांना या नव्या निर्देशांमुळे दिलासा मिळेल.
या परिपत्रकानुसार जो क्रेडिट कार्डधारक त्याला पाठविलेल्या मासिक स्टेटमेंटमध्ये दाखविलेली किमान थकित रक्कम, स्टेटमेंटमध्ये दिलेल्या मुदतीनंतर ९० दिवसांत चुकती करणार नाही त्यालाच बँका थकबाकीदार ठरवू शकतील.
म्हणजेच एखादे क्रेडिटकार्ड खाते ‘पास्ट ड्यूज’ अशा स्थितीत तीन दिवसांहून अधिक काळ राहिले तरच बँका दंड आकारू शकतील किंवा थकबाकीची माहिती पतमाहिती संस्थांना कळवू शकतील. मात्र दंड आकारणी स्टेटमेंटमध्ये दिलेल्या मुदतीच्या दिवसापासून केली जाईल.
आधी पुढील स्टेटमेंटच्या तारखेपासून ९० दिवसांत पैसे न मिळाल्यास तो कार्डधारक थकबाकीदार मानला जायचा. (विशेष प्रतिनिधी)

पत माहिती संस्थांनाही तीन दिवसांनीच सूचना मिळणार
1) कार्डधारकाने मुदतीत थकबाकी चुकती केली नाही तर बँका त्याची माहितीही ‘सिबिल’सारख्या पतमाहिती संस्थांना लगेच कळवत असतात. याचा संबंधित ग्राहकास नवे कर्ज मिळण्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. मात्र आता दंड आकारणीप्रमाणेच बँकांनी थकबाकी चुकती न केल्याची माहितीही संबंधित पतसंस्थांना मुदतीनंतर तीन दिवस उलटल्यानंतर कळवावी, असेही रिझर्व्ह बँकेने बँकांना सांगितले आहे.
2) खरे तर पुढील स्टेटमेंटच्या तारखेपर्यंत थांबून मगच थकबाकीवर दंड आकारमी करावी व त्याची माहिती पतआलेखन संस्थांना पुरवावी, असे रिझर्व्ह बँकेने याआाधीही सांगितले होते. तरीही बँका थकबाकी चुकती करण्याची मुदत ंसपली की लगेच दंड आकारणी करीत राहिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने हे नवे परिपत्रक बँकांना पाठविले आहे.

Web Title: Three days after the deadline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.