Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिझर्व्ह बँकेच्या संचालकपदी तिघांच्या नियुक्त्या

रिझर्व्ह बँकेच्या संचालकपदी तिघांच्या नियुक्त्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रिझर्व्ह बँकेच्या संचालकपदी तीन जणांच्या नियुक्त्या केल्या. मंत्रिमंडळाच्या नियुक्त्या विषयक समितीने (एसीसी) या तिघांच्या नावांना मंजुरी दिलेली आहे.

By admin | Updated: March 5, 2016 03:13 IST2016-03-05T03:13:33+5:302016-03-05T03:13:33+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रिझर्व्ह बँकेच्या संचालकपदी तीन जणांच्या नियुक्त्या केल्या. मंत्रिमंडळाच्या नियुक्त्या विषयक समितीने (एसीसी) या तिघांच्या नावांना मंजुरी दिलेली आहे.

Three appointments as RBI director | रिझर्व्ह बँकेच्या संचालकपदी तिघांच्या नियुक्त्या

रिझर्व्ह बँकेच्या संचालकपदी तिघांच्या नियुक्त्या

हरीश गुप्ता,  नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रिझर्व्ह बँकेच्या संचालकपदी तीन जणांच्या नियुक्त्या केल्या. मंत्रिमंडळाच्या नियुक्त्या विषयक समितीने (एसीसी) या तिघांच्या नावांना मंजुरी दिलेली आहे.
नवनियुक्त संचालकांमध्ये टाटा कन्सल्टन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नटराजन चंद्रशेकरन, महिंद्रा अँड महिंद्राचे अ-कार्यकारी चेअरमन भारत दोषी आणि सुधीर मंकड यांचा समावेश आहे. ते रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर बोर्डावर जातील. त्यांची नियुक्ती अर्धवेळ असून बिगर सरकारी संचालक म्हणून ते रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय बोर्डावर चार वर्षांसाठी काम पाहतील. चंद्रशेकरन आणि भारत दोषी यांना उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून बोर्डावर घेण्यात आले आहे. सुधीर मंकड हे पंतप्रधान मोदी यांचे निकटवर्तीय समजले जातात. ते गुजरात कॅडरचे आयएएस अधिकारी असून २00५ मध्ये मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा ते त्या राज्याचे मुख्य सचिव होते.
आर्थिक सेवा विभागाने या नियुक्त्यांचा प्रस्ताव ठेवला होता. त्यांना मंत्रिमंडळाच्या नियुक्त्यांविषयक समितीने मंजुरी दिली आहे. नियुक्तीची अधिसूचना निघाल्यापासून चार वर्षे अथवा पुढील आदेश येईपर्यंत त्यांच्या नियुक्त्या असतील, असे सांगण्यात आले.

Web Title: Three appointments as RBI director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.