श्रीरामपूर (अहमदनगर) : अतिरिक्त उसामुळे विक्रमी साखर उत्पादन केलेल्या साखर कारखानदारीत साखरेच्या भावाची घसरण सुरूच आहे. जागतिक बाजारपेठ व देशांतर्गत अतिरिक्त साठ्यामुळे प्रतिक्विंटल ३२०० रूपयांवरून २२०० रूपयांपर्यंत भाव गडगडल्याने साखरेच्या भावात वर्षभरात १ हजार रूपयांची घसरण झाली. या हंगामात कारखान्यांना सरासरी ४० कोटींचा तोटा येईल, असा जाणकारांचा अंदाज आहे.
जागतिक बाजारपेठेत आजची स्थिती कायम राहिल्यास आगामी काळात प्रतिक्विंटल साखरेचे दर १८०० रूपयापर्यंत घसरण्याची शक्यता आहे. यावर्षी कारखान्यांना सरासरी ४० कोटींचा तोटा येणार असल्याने कारखानदारांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या हंगामात एफ.आर.पी.प्रमाणे दर देण्यासाठी अबकारी कर्ज व यावर्षी दिले जाणारे कर्ज धरुन यापुढे दोन वर्षात राज्यातील कारखान्यांवर सुमारे ७० ते १०० कोटी तोटा व कर्जाचा बोजा पडण्याची भीती आहे.
सरकारकडून शाश्वत दराची हमी, चढउतार निधीची सक्ती, दीर्घकालीन आयात निर्यात धोरण, इथेनॉल व वीज निर्मितीस प्रोत्साहन आदी उपाययोजनांची अपेक्षा आहे, असे अशोक सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर खंडागळे यांनी सांगितले.
देशात आजमितीला एकूण ३४० लाख टन साठा देशात शिल्लक आहे. देशाची मागण २३० लाख टनच असल्याने पुढील हंगामापूर्वी ११० लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहील.
साखरेत वर्षभरात हजाराची घसरण
अतिरिक्त उसामुळे विक्रमी साखर उत्पादन केलेल्या साखर कारखानदारीत साखरेच्या भावाची घसरण सुरूच आहे. जागतिक बाजारपेठ व देशांतर्गत
By admin | Updated: June 21, 2015 23:45 IST2015-06-21T23:45:51+5:302015-06-21T23:45:51+5:30
अतिरिक्त उसामुळे विक्रमी साखर उत्पादन केलेल्या साखर कारखानदारीत साखरेच्या भावाची घसरण सुरूच आहे. जागतिक बाजारपेठ व देशांतर्गत
