Lokmat Money > बिझनेस न्यूज > तुसे शाळेतील विद्यार्थ्यांची नाल्यातील पाण्यातून जीवघेणी वाट

तुसे शाळेतील विद्यार्थ्यांची नाल्यातील पाण्यातून जीवघेणी वाट

कुडूस : पिंपरोली-तुसे रस्त्यावरील पूल कोसळून एक वर्षाचा कालावधी होत आला तरीही बांधकाम न झाल्याने बांधकाम खात्याच्या सुस्त कारभाराचा फटका मुलांच्या शिक्षणाला बसत आहे. शाळेला येता-जाता या मुलांना नाल्याच्या पाण्यातून जीवघेणी वाट काढावी लागते.

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST2014-08-25T21:40:41+5:302014-08-25T21:40:41+5:30

कुडूस : पिंपरोली-तुसे रस्त्यावरील पूल कोसळून एक वर्षाचा कालावधी होत आला तरीही बांधकाम न झाल्याने बांधकाम खात्याच्या सुस्त कारभाराचा फटका मुलांच्या शिक्षणाला बसत आहे. शाळेला येता-जाता या मुलांना नाल्याच्या पाण्यातून जीवघेणी वाट काढावी लागते.

Thousands of students are awakened from the waters of the Nullah | तुसे शाळेतील विद्यार्थ्यांची नाल्यातील पाण्यातून जीवघेणी वाट

तुसे शाळेतील विद्यार्थ्यांची नाल्यातील पाण्यातून जीवघेणी वाट

डूस : पिंपरोली-तुसे रस्त्यावरील पूल कोसळून एक वर्षाचा कालावधी होत आला तरीही बांधकाम न झाल्याने बांधकाम खात्याच्या सुस्त कारभाराचा फटका मुलांच्या शिक्षणाला बसत आहे. शाळेला येता-जाता या मुलांना नाल्याच्या पाण्यातून जीवघेणी वाट काढावी लागते.
पिंपरोली-तुसे या रस्त्यावरील पूल ऑक्टोबर २०१३ मध्ये कोसळला. या मार्गावरील मुलींच्या मोफत प्रवासाच्या सावित्रीच्या लेकी व अन्य दोन बस त्यामुळे बंद झाल्या. सहा गावे व दहा पाड्यांवरील तुसे व वाडा येथील शाळेत जाणार्‍या पाचवी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांची पायपीट वर्षभर सुरू आहे. पुलाच्या पर्यायी मार्गावरील मोरीसह रस्ता वाहून गेल्याने शाळेतील मुली व मुलांना एकमेकांचे हात धरून नाल्यातील पाण्यातून जीव मुठीत घेऊन वाट काढावी लागते.
या नाल्यावरील पुलाचे काम बांधकाम खात्याचे अधिकारी स्वत:च करीत आहेत. मात्र, अत्यंत धीम्या गतीने ते सुरू आहे़ याचा संताप पालकांत असून मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. याबाबत तुसे विद्यालयाचे संस्थापक मधुकर देशमुख यांनी बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनी पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

(वार्ताहर / अशोक पाटील)

फोटो आहेत.

Web Title: Thousands of students are awakened from the waters of the Nullah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.