Lokmat Money > बिझनेस न्यूज > सलग तिसऱ्या वर्षी सोन्याची चमक फिकी

सलग तिसऱ्या वर्षी सोन्याची चमक फिकी

मावळत असलेल्या २०१५ या वर्षात सलग तिसऱ्या वर्षी सोन्याची चमक कमी झाली. या काळात सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅममागे एक हजार रुपयांनी घसरले.

By admin | Updated: December 26, 2015 02:05 IST2015-12-26T02:05:42+5:302015-12-26T02:05:42+5:30

मावळत असलेल्या २०१५ या वर्षात सलग तिसऱ्या वर्षी सोन्याची चमक कमी झाली. या काळात सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅममागे एक हजार रुपयांनी घसरले.

For the third year in a row, the brightness of gold | सलग तिसऱ्या वर्षी सोन्याची चमक फिकी

सलग तिसऱ्या वर्षी सोन्याची चमक फिकी

मुंबई : मावळत असलेल्या २०१५ या वर्षात सलग तिसऱ्या वर्षी सोन्याची चमक कमी झाली. या काळात सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅममागे एक हजार रुपयांनी घसरले. सोन्याचे भाव घसरत असल्याने गुंतवणूकदार, अन्य पर्यायांच्या शोधात असल्याचे यावेळी दिसून आले.
सोन्याचे भाव घसरले असताना आणि गुंतवणूकदारही अन्य पर्यायांच्या शोधात असताना सरकारनेही विविध संस्था आणि घराघरात असलेले सोने बाहेर काढण्यासाठी सुवर्ण रोखे जारी केले. चांदीची स्थितीही चांगली राहिली नाही. वर्षभरात चांदीच्या दरात ८ टक्क्यांनी घट झाली. सोन्याचे भावही पाच टक्क्यांनी घटले.
रुपयाच्या विनिमय दरात चढ-उतार आणि अमेरिकेत व्याजदरातील वृद्धीबाबत प्रदीर्घ काळ चाललेली संभ्रमाची स्थिती यामुळे वर्षभर सोन्याच्या भावात चढ-उतार होत राहिले. चीनमधील अर्थव्यवस्थेत आलेली मंदीही चिंतेचे एक कारण बनली. देशांतर्गत कमी झालेली मागणी आणि जगभरातही तीच स्थिती राहिली. सोन्याच्या सराफा बाजारात ही स्थिती निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे मोर्चा वळविला आणि चांगल्या रिटर्नसाठी प्रयत्न चालविले.
सोन्याच्या आयातीवर अंकुश लावण्याचे प्रयत्न सरकारतर्फे करण्यात आले. त्याचवेळी सरकारने सुवर्ण रोख्यांची योजना आणली वर्षाच्या प्रारंभी सोन्याचे भाव २६,७०० रुपये प्रति १० ग्रॅम होते. वर्षभरातील चढ-उतारानंतर २५,५०० रुपये प्रति दहा ग्रॅमच्या आसपास ते आले.
२०१५ मध्ये चांदीसुद्धा ३७,२०० रुपयांवरून घसरून ३४,३०० रुपये प्रति किलो झाली. भावातील चढ-उतारामुळे गुंतवणूक म्हणून खरेदी करणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी झाली. कमी पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीने ग्रामीण कुटुंबाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळेही सोन्याच्या मागणीत घट झाली.
गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडस् (ईटीएफ) मधून मोठ्या प्रमाणावर सोने काढून घेण्यात आल्यानेही सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला. सरकारने आणि रिझर्व्ह बँकेने वर्ष अखेरीस सोन्याच्या आयातीवर असलेल्या निर्बंधात शिथिलता दिली; पण त्याचाही सोन्याच्या भावावर परिणाम झाला नाही.वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये देशातील सोन्याची आयात ३६.४८ टक्क्यांनी घटून ३.५३ अब्ज डॉलर झाली.
चांदीची आयातही ५५ टक्क्यांनी घसरून २८.५० कोटी डॉलर झाली. वर्षाच्या प्रारंभी सोने २८ हजाराचा स्तर गाठण्यात यशस्वी झाले. जानेवारीच्या मध्यात सोन्याचा भाव २८,२१५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला; पण ही तेजी काही काळच राहिली. त्यानंतर सोन्याच्या घटत्या भावाचा परिणाम चांदीवरही झाला. जुलैपर्यंत सोन्याचा भाव २५ हजारापेक्षा खाली जाऊन २४,५९० रुपये झाला. २०११ नंतर हा सोन्याचा नीचांक आहे. आॅगस्टमध्ये हा भाव पुन्हा २७,२५० रुपयांपर्यंत गेला.

 

Web Title: For the third year in a row, the brightness of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.