अोला : शहराच्या कानाकोपर्यात कचर्याचे ढीग साचणार नाहीत, या उद्देशातून मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आराखडा तयार केला. कचरा उचलण्यासाठी झोननिहाय ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात आले असून, यासंदर्भात संबंधित अधिकार्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.शहरात घाणीने गच्च भरलेल्या नाल्या-गटारे, नादुरुस्त पथदिवे व ठिकठिकाणी साचणार्या कचर्यामुळे अकोलेकर वैतागले आहेत. आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या कालावधीत पहिल्यांदाच नाला सफाईचे अतिशय काटेकोरपणे नियोजन केल्याचे समोर आले असून, नाला सफाईची कामे सुरू आहेत. यादरम्यान, शहराच्या विविध भागात सहा-सहा दिवस कचरा उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. कचरा उचलण्याचा कंत्राट मनपाने क्षितिज नामक संस्थेला दिला आहे. या कामासाठी कंत्राटदाराने २० ट्रॅक्टर लावले असून, नियमित कचरा उचलण्याचा दावा केला जातो. असे असतानासुद्धा शहरात कचर्याचे ढीग साचल्याचे चित्र आहेे. या पृष्ठभूमीवर आयुक्त डॉ.कल्याणकर यांनी कचरा उचलण्यासाठी नागरिकांच्या दिमतीला झोननिहाय एकूण १९ ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नागरिकांना संबंधित ट्रॅक्टर चालक, कंत्राटदाराच्या पर्यवेक्षकांचे व वैद्यकीय आरोग्य अधिकार्यांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. तातडीच्या कामासाठी सर्व प्रभागांकरिता एक ट्रॅक्टर नेहमीसाठी कार्यरत राहील. बॉक्स..झोननिहाय पर्यवेक्षकांचे मोबाईल क्रमांकपूर्व झोन- राजू सावंत ९८२२३१७०७८पश्चिम झोन- विजय कवडे ९८२२२९५४१४, ९१७५५३२९९७उत्तर झोन-दत्ता उगले ९७३००३३१९६, ८१८०८८४१३३दक्षिण झोन-वानखडे ९१५६३७९२५२मुख्य रस्ते व जनता बाजार-मोहन देशपांडे ९१७५४२३०८१, ७७७४८७९०३०डॉ.फारूख शेख वैद्यकीय अधिकारी मनपा-९१७५७२९०६५सुरेश पुंड सहाय्यक आरोग्य अधिकारी-७७०९०४९४६०कोट..नागरिकांच्या समस्या त्वरित निकाली काढण्याच्या उद्देशातून आयुक्तांनी सदर आराखडा तयार केला आहे. संबंधित पर्यवेक्षकांना सांगितल्यावरदेखील समस्या निकाली न निघाल्यास आम्ही सेवेसाठी उपलब्ध आहोत.-डॉ.फारूख शेख, वैद्यकीय अधिकारी मनपा
कचरा उचलण्यासाठी मनपाचा आराखडा झोननिहाय ट्रॅक्टर होणार उपलब्ध
अकोला : शहराच्या कानाकोपर्यात कचर्याचे ढीग साचणार नाहीत, या उद्देशातून मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आराखडा तयार केला. कचरा उचलण्यासाठी झोननिहाय ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात आले असून, यासंदर्भात संबंधित अधिकार्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.
By admin | Updated: June 21, 2014 00:15 IST2014-06-21T00:15:35+5:302014-06-21T00:15:35+5:30
अकोला : शहराच्या कानाकोपर्यात कचर्याचे ढीग साचणार नाहीत, या उद्देशातून मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आराखडा तयार केला. कचरा उचलण्यासाठी झोननिहाय ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात आले असून, यासंदर्भात संबंधित अधिकार्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.
