Lokmat Money > बिझनेस न्यूज > जूनपर्यंत रोजगारांत होणार मोठी वाढ

जूनपर्यंत रोजगारांत होणार मोठी वाढ

जानेवारी ते जून या अवधीत आयटी, वस्तू उत्पादन आणि किरकोळ यासारख्या क्षेत्रात रोजगार निर्मितीत वाढ होणार असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे

By admin | Updated: March 23, 2016 03:39 IST2016-03-23T03:39:22+5:302016-03-23T03:39:22+5:30

जानेवारी ते जून या अवधीत आयटी, वस्तू उत्पादन आणि किरकोळ यासारख्या क्षेत्रात रोजगार निर्मितीत वाढ होणार असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे

There will be huge increase in employment till June | जूनपर्यंत रोजगारांत होणार मोठी वाढ

जूनपर्यंत रोजगारांत होणार मोठी वाढ

नवी दिल्ली : जानेवारी ते जून या अवधीत आयटी, वस्तू उत्पादन आणि किरकोळ यासारख्या क्षेत्रात रोजगार निर्मितीत वाढ होणार असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६0 टक्के रोजगार निर्मात्यांनी वाढीच्या बाजूने कौल दिला.
‘नोकरी हायरिंग आऊटलूक-२0१६’ या अहवालात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आगामी काळात १ ते ३ वर्षे अनुभव असणाऱ्या उमेदवारांना सर्वाधिक नोकऱ्या मिळतील असे मत रोजगार देणाऱ्या ४0 टक्के संस्थांनी व्यक्त केले. आयटी क्षेत्रात रोजगार निर्मिती सर्वाधिक १६ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

वस्तू उत्पादन आणि किरकोळ क्षेत्रातील रोजगार निर्मितीत ८ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. आयटी क्षेत्रानंतर सर्वांत मोठी वाढ याच क्षेत्रात आहे, असे अहवालात म्हटले आहे.
नोकरी डॉट कॉमचे प्रमुख विक्री अधिकारी व्ही. सुरेश यांनी म्हटले की, नोकरी हायरिंग सर्वेक्षणानुसार नोकर भरती करणारे आगामी काही महिन्यांत सतर्क असतील; मात्र त्याच बरोबर ते आशावादीही असतील.

Web Title: There will be huge increase in employment till June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.