Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याच्या किमतीत किंचीत वाढ

सोन्याच्या किमतीत किंचीत वाढ

जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमतीत ५0 रुपयांची वाढ झाली.

By admin | Updated: September 6, 2016 12:02 IST2016-09-06T05:22:41+5:302016-09-06T12:02:19+5:30

जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमतीत ५0 रुपयांची वाढ झाली.

There is a slight increase in gold prices | सोन्याच्या किमतीत किंचीत वाढ

सोन्याच्या किमतीत किंचीत वाढ


नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमतीत ५0 रुपयांची वाढ झाली. त्याबरोबर सोने ३१,0५0 रुपये तोळा झाले. चांदीही ५0 रुपयांनी वाढून ४५,९५0 रुपये किलो झाली.
लंडनच्या बाजारात सोने 0.१८ टक्क्यांनी वाढून १,३२७.२0 डॉलर प्रति औंस, तर चांदी 0.0३ टक्क्यांनी वाढून १९.४२ डॉलर प्रति औंस झाली. दिल्लीत ९९.९ टक्के व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ५0 रुपयांनी वाढून अनुक्रमे ३१,0५0 आणि ३0,९00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. तयार चांदीचा भाव ५0 रुपयांनी वाढून ४५,९५0 झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ४५,४८0 रुपये किलो असा स्थिर राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: There is a slight increase in gold prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.