नवी दिल्ली : एच१-बी व्हिसा व्यवस्थेत लक्षणीय स्वरूपात बदल होणार नसल्याचे अमेरिकेने भारताला कळविले आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. लोकसभेत त्या म्हणाल्या की, एच१-बी व्हिसा संबंधीच्या आपल्या चिंता भारत अमेरिकेकडे जोरकसपणे मांडत आहे. तथापि, या व्हिसा व्यवस्थेत फार महत्त्वाचे फेरबदल होणार नसल्याने ट्रम्प प्रशासनाने कळविले आहे.
प्रश्नोत्तराच्या तासात सीतारामन म्हणाल्या की, एच१-बी व्हिसा व्यवस्थेत बदल होण्याची भीती किमान २0१७ मध्ये खरी होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सध्या बेकायदेशीर इमिग्रेशन समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
एच१-बी व्हिसा व्यवस्थेत लक्षणीय बदल नाही
एच१-बी व्हिसा व्यवस्थेत लक्षणीय स्वरूपात बदल होणार नसल्याचे अमेरिकेने भारताला कळविले आहे, अशी माहिती केंद्रीय
By admin | Updated: March 21, 2017 00:40 IST2017-03-21T00:40:34+5:302017-03-21T00:40:34+5:30
एच१-बी व्हिसा व्यवस्थेत लक्षणीय स्वरूपात बदल होणार नसल्याचे अमेरिकेने भारताला कळविले आहे, अशी माहिती केंद्रीय
