नवी दिल्ली : मावळत्या २०१४ वर्षात घाऊक किमतीसाठी चलनवाढ शून्यावर आणि किरकोळ विक्रीत ४.४ टक्क्यांपेक्षा जास्त घटूनही ही परिस्थिती व्याजदर कमी होेण्यासाठी अजून तरी पोषक नाही. चलनवाढ प्रचंड होत असतानाच्या दिवसांतील भीती आजही सूक्ष्म अर्थव्यवस्थेच्या मानेवर बसलेली आहे.
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करायच्या आधी महत्त्वाच्या सूक्ष्म अर्थव्यवस्थेच्या उपायांमध्ये सतत घट होण्यासाठी नव्या वर्षात वाट बघेल. संपूर्ण २०१४ वर्षात उद्योग क्षेत्र आणि सरकारने व्याजदरात कपात करावी, अशी मागणी लावून धरली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या आणि इतर वस्तूंच्या घसरणाऱ्या किमती बघता चलनवाढीचा दर किमान किरकोळ बाजारपेठेत तरी घसरताच राहील, असे संकेत आहेत. नोव्हेंबरमध्ये किरकोळ वस्तूंच्या बाजारपेठेत २०१४ सुरू होताच तब्बल ९ टक्के असलेली चलनवाढ ४.४ टक्क्यांवर आली. घाऊक किंमत निर्देशांकावर चलनवाढ आधारित असते. ती जानेवारी २०१४ मध्ये ५ टक्के होती, ती गेल्या आॅक्टोबरमध्ये शून्यावर आली होती. त्यात आणखी घट झाल्यास ती नकारात्मक चलनवाढ समजली जाते. तथापि, एकूण अर्थव्यवस्थेवर अशा नकारात्मक चलनवाढीचा काही परिणाम होईल अशी अपेक्षा अर्थतज्ज्ञांना नसते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्चलनवाढीला रोखण्याच्या उपायांमुळे ग्राहक आणि सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. २०१३ मध्ये दोन आकडी चलनवाढीला तोंड दिले होते.
च्जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सतत होत असलेली घट चलनवाढ खाली येण्यास फार मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरली आहे.
चलनवाढ घटली तरी व्याज कपात नाही
मावळत्या २०१४ वर्षात घाऊक किमतीसाठी चलनवाढ शून्यावर आणि किरकोळ विक्रीत ४.४ टक्क्यांपेक्षा जास्त घटूनही ही परिस्थिती व्याजदर कमी होेण्यासाठी अजून तरी पोषक नाही.
By admin | Updated: January 1, 2015 02:14 IST2015-01-01T02:14:33+5:302015-01-01T02:14:33+5:30
मावळत्या २०१४ वर्षात घाऊक किमतीसाठी चलनवाढ शून्यावर आणि किरकोळ विक्रीत ४.४ टक्क्यांपेक्षा जास्त घटूनही ही परिस्थिती व्याजदर कमी होेण्यासाठी अजून तरी पोषक नाही.
