नवी दिल्ली : सरकारी बँकांमध्ये यापुढे लिपिक व त्याखालील पदे भरताना उमेदवारांना मुलाखत द्यावी लागणार नाही. त्याला फक्त लेखी परीक्षा द्यावी लागेल. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बँकांना लेखी परीक्षा अधिक कडक करावी, अशी सूचना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केलेल्या घोषणेप्रमाणे हा बदल केला जाणार आहे.
अर्थ मंत्रालयाने सर्व सरकारी बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.
१ जानेवारी २०१६ पासून तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये मुलाखत रद्द करण्याची घोषणा पंतप्रधानांनी अलीकडेच केली. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले होते.
एखाद्या मंत्रालयाला विशिष्ट प्रकरणात मुलाखत घेण्याची आवश्यकता वाटली तर संबंधित खात्याच्या मंत्र्यांची मंजूरी घेवून तसा विस्तृत प्रस्ताव कार्मिक व प्रशिक्षण विभागाला पाठवावा व मंजूरी घ्यावी. सर्व मंत्रालयांना ७ जानेवारीपर्यंत पूर्तता अहवाल पाठविण्यास सांगण्यात आले आहे.
बँकेच्या लिपिक पदासाठी आता मुलाखत नाही
सरकारी बँकांमध्ये यापुढे लिपिक व त्याखालील पदे भरताना उमेदवारांना मुलाखत द्यावी लागणार नाही. त्याला फक्त लेखी परीक्षा द्यावी लागेल.
By admin | Updated: January 4, 2016 02:29 IST2016-01-04T02:29:05+5:302016-01-04T02:29:05+5:30
सरकारी बँकांमध्ये यापुढे लिपिक व त्याखालील पदे भरताना उमेदवारांना मुलाखत द्यावी लागणार नाही. त्याला फक्त लेखी परीक्षा द्यावी लागेल.
