लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात जीएसटी लागू झाला असला तरी, त्याबाबत ग्राहक आणि व्यापाऱ्यांत अजूनही बरीचशी गोंधळाची स्थिती दिसून येत आहे. त्यातच सोशल मीडियावर जीएसटीबाबत अनेक अफवा पसरलेल्या आहेत.
त्यापैकी एक अफवा व्हॉटसअॅपवर एका मेसेजद्वारे फिरत आहे. टेलिफोन, मोबाइल, गॅस, वीज यांसारख्या सेवांची बिले क्रेडिट कार्डाद्वारे भरल्यास दोनवेळा सेवा कर कापला जाईल, असे या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे. सरकारने याचा इन्कार केला असून, अशा मेसेजकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे.
व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये म्हटले आहे की, ‘क्रेडिट कार्डाद्वारे बिल अदा केल्यास एकदा या सेवेच्या रकमेवर सेवाकर कापला जाईल. त्याच प्रमाणे दुसऱ्यांदा क्रेडिट कार्डचा वापर केला म्हणून पुन्हा तेवढाच सेवाकर कापला जाईल. त्यामुळे कोणतीही बिले के्रडिट कार्डद्वारे भरू नका. एकतर रोखीने बिले भरा किंवा इंटरनेट बँकिंगचा वापर करा.’
केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी याबाबत खुलासा करणारे ट्विट केले आहे. अधिया यांनी म्हटले की, ‘युटिलिटी बिले क्रेडिट कार्डद्वारे भरल्यास दोन वेळा जीएसटी लागेल, असा अत्यंत चुकीचा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे.
या मेसेजमधील माहिती पूर्णत: खोटी आहे. सक्षम अधिकाऱ्याकडून खात्री करून घेतल्याशिवाय असे मेसेज नागरिकांनी कृपया फॉरवर्ड करू नयेत’
जीएसटीमध्ये ब्रॉडबँड, मोबाइल, पाइप गॅस, एलपीजी सिलिंडर इ. सेवांवर आधीच्या तुलनेत जास्त कर लावण्यात आला आहे. पण त्याचा क्रेडिट कार्ड पेमेंटशी काहीच संबंध नाही.
सेवाकर आधीपासूनच, अधिकची रक्कम लागणार नाही
जीएसटीच्या आधीही बँकांकडून केवळ व्याजाची परतफेड, वार्षिक शुल्क आणि मासिक हप्त्यांवरील प्रोसेसिंग शुल्क यावरच सेवाकर आकारला जात होता. के्रडिट कार्डवरील पेमेंटवर सेवाकर आकारला जात नव्हता.
वित्तीय सेवांवरील सेवाकर आधी १५ टक्के होता. जीएसटीत तो १८ टक्के झाला आहे. तुम्ही तुमचे क्रेडिट बिल नियोजित कालावधीपेक्षा उशिरा अदा केले, तर तुम्हाला अधिकची रक्कम अदा करावी लागेल. कारण त्यावरील व्याज आणि लेट पेमेंट शुल्क तुम्हाला द्यावे लागेल.
नियमित कालावधीत भरणा केल्यास कोणत्याही प्रकारची अधिकची रक्कम लागणार नाही.
क्रेडिट कार्डच्या पेमेंटवर दुप्पट जीएसटी नाही
देशात जीएसटी लागू झाला असला तरी, त्याबाबत ग्राहक आणि व्यापाऱ्यांत अजूनही बरीचशी गोंधळाची स्थिती दिसून येत आहे. त्यातच
By admin | Updated: July 5, 2017 01:02 IST2017-07-05T01:02:49+5:302017-07-05T01:02:49+5:30
देशात जीएसटी लागू झाला असला तरी, त्याबाबत ग्राहक आणि व्यापाऱ्यांत अजूनही बरीचशी गोंधळाची स्थिती दिसून येत आहे. त्यातच
