नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील मंदीसदृश स्थिती आणि निर्यातीत होत असलेली घट पाहता निर्यात प्रोत्साहनासाठी आता नवी योजना तयार करावी लागेल, असे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले.
येथे आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. जेटली म्हणाले की, जगभरातील बाजारपेठेने आम्हाला एक वास्तवता निदर्शनास आणून दिली आहे की, जगातील लोकांना चांगले उत्पादन पाहिजे. अर्थात ते स्वस्तातही पाहिजे. अशा काळात आपल्याला प्रतिस्पर्धींपेक्षा वेगळा विचार करावा लागेल. प्रतिस्पर्धींपेक्षा किमान दरात गुणवत्तापूर्ण उत्पादन देण्याचे आव्हान आज आपल्यासमोर आहे. अशा परिस्थितीत आपल्याला खडतर आर्थिक परिस्थितीतही मोठी बाजारपेठ मिळविण्यात यश मिळू शकेल. जागतिक बाजारपेठेत ग्राहकांची खरेदीची क्षमता संकुचित होत आहे. अशा परिस्थितीत उत्पादकांना ग्राहक मिळविणे अवघड जाते.
निर्यात प्रोत्साहनासाठी नवी योजना तयार करावी लागेल
जागतिक पातळीवरील मंदीसदृश स्थिती आणि निर्यातीत होत असलेली घट पाहता निर्यात प्रोत्साहनासाठी आता नवी योजना तयार करावी लागेल, असे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले.
By admin | Updated: November 28, 2015 00:01 IST2015-11-28T00:01:52+5:302015-11-28T00:01:52+5:30
जागतिक पातळीवरील मंदीसदृश स्थिती आणि निर्यातीत होत असलेली घट पाहता निर्यात प्रोत्साहनासाठी आता नवी योजना तयार करावी लागेल, असे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले.
