Lokmat Money > बिझनेस न्यूज > उडीद डाळीच्या आयातीसाठी निविदा मागविल्या

उडीद डाळीच्या आयातीसाठी निविदा मागविल्या

डाळींच्या भडकत्या किमतींना रोखण्याच्या हेतूने सरकारने सप्टेंबरपासून देशांतर्गत मागणी अबाधित राहण्यासाठी म्यानमार व अन्य देशांकडून ५ हजार टन उडीद डाळ आयात

By admin | Updated: July 17, 2015 23:46 IST2015-07-17T23:46:39+5:302015-07-17T23:46:39+5:30

डाळींच्या भडकत्या किमतींना रोखण्याच्या हेतूने सरकारने सप्टेंबरपासून देशांतर्गत मागणी अबाधित राहण्यासाठी म्यानमार व अन्य देशांकडून ५ हजार टन उडीद डाळ आयात

Tender for import of urad pulses | उडीद डाळीच्या आयातीसाठी निविदा मागविल्या

उडीद डाळीच्या आयातीसाठी निविदा मागविल्या

नवी दिल्ली : डाळींच्या भडकत्या किमतींना रोखण्याच्या हेतूने सरकारने सप्टेंबरपासून देशांतर्गत मागणी अबाधित राहण्यासाठी म्यानमार व अन्य देशांकडून ५ हजार टन उडीद डाळ आयात करण्यासाठी निविदा प्रसिद्धीस दिली आहे.
एमएमटीसी या सरकारी यंत्रणेने ५ हजार टन उडीद डाळीच्या आयातीसाठी निविदा मागविली आहे. डाळींच्या आयातीसाठी एमएमटीसीने प्रसिद्धीस दिलेली ही दुसरी निविदा आहे. याआधी ५ हजार टन तुरीच्या डाळीच्या आयातीसाठी निविदा काढण्यात आली होती. पीक वर्ष २०१४-२०१५मध्ये डाळींचे उत्पादन २० टक्क्यांनी घटले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Tender for import of urad pulses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.