बक्स...टॉवर दुसरे, सेवा तिसरीच!काही इमारतींवर टॉवर उभारणारी कंपनी वेगळी असून, त्या टॉवरचा वापर एकाचवेळी तीन वेगवेगळ्या मोबाईल कंपन्या करीत असल्याचे कारवाईदरम्यान समोर आले. अर्थात, एकाच टॉवरवरून दोन किंवा तीन विविध मोबाईल कंपन्या सेवा पुरवित असल्याचे मनपा अधिकार्यांच्या निदर्शनास आले. यामुळे टॉवरची संख्या कमी असली तरी सील लावण्यात आलेल्या मोबाईल कंपन्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. बॉक्स...कंपन्यांचे धाबे दणाणले!मोबाईल टॉवर सील करताच कंपन्यांचे चांगलेच धाबे दणाणले. काही तासांकरिता सेवा खंडित राहिल्यास कंपन्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते, याचे भान ठेवून कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मनपातील वरिष्ठ अधिकार्यांसोबत चर्चा करून पैसे भरण्याची तयारी दर्शविल्याची माहिती आहे.बॉक्स...एकाच टॉवरवर ११ मोबाईल कंपन्यांचे अतिक्रमणखुले नाट्यगृहासमोरील चांदेकर भवनवर एकाच टॉवरवरून चक्क ११ विविध मोबाईल कंपन्यांनी सेवा पुरविल्याचा धक्कादायक प्रकार रात्री उघडकीस आला. मनपाचे अधिकारी या ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित करतील, हे गृहीत धरून कंपनीच्या कर्मचार्याने जनरेटरद्वारे विद्युत पुरवठा सुरू केला आणि टॉवरजवळ जाणार्या मार्गाला कुलूप लावून धूम ठोकली. मनपा अधिकार्यांनीदेखील चक्क अग्निशमन विभागाचे वाहन बोलावून शिडीद्वारे टॉवर गाठले व महावितरणचा विद्यूत पुरवठा खंडित केला. जनरेटरद्वारे मात्र विद्युत पुरवठा सुरू होता. त्यामधील डिझेल संपताच, या ठिकाणची सेवासुद्धा खंडित होईल, हे न्ििात आहे. कोट...शासनाने जारी केलेल्या नवीन निकषानुसार मोबाईल कंपन्यांनी परवान्याचे नूतनीकरण करणे क्रमप्राप्त आहे. याकरिता कंपन्यांना नोटीस बजावून सुचित केले होते. त्यानंतरही कंपन्यांनी प्रस्ताव सादर केले नाहीत. परिणामी कारवाईचे पाऊल उचलावे लागले. -संदीप गावंडे, सहाय्यक नगर रचनाकार मनपा
दहा मोबाईल टॉवर सील-जोड बातमी २
बॉक्स...
By admin | Updated: September 11, 2014 22:30 IST2014-09-11T22:30:47+5:302014-09-11T22:30:47+5:30
बॉक्स...
