नवी दिल्ली : लँडलाईन सेवा लोकप्रिय करून त्या माध्यमातून इंटरनेटची कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या दृष्टीने लँडलाईन फोनवरून अन्य नेटवर्कवर केल्या जाणाऱ्या फोनचे आंतरजोडणी शुल्क शून्य करण्याचा निर्णय दूरसंचार प्राधिकरणाने घेतला आहे. यामुळे लँडलाईन सेवा स्वस्त होणार असून याचसोबत मोबाईल ते लँडलाईन आणि मोबाईल ते मोबाईलवरील आंतरजोडणी शुल्कात कपात केल्याने मोबाईल सेवेचे दरही स्वस्त होण्याचे संकेत मिळत आहेत.
टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथोरिटी आॅफ इंडिया अर्थात ‘ट्राय’ने आज, सोमवारी या निर्णयाची घोषणा केली. या निर्णयानुसार, सध्या लँडलाईन ते लँडलाईन आणि लँडलाईन ते मोबाईल फोन याकरिता आंतरजोडणी शुल्कापोटी २० पैशांची आकारणी होते, हे शुल्क रद्द करण्यात आले आहे. तर, मोबाईलवरून लँडलाईन कॉल्सवरील हे शुल्क ही रद्द करण्यात आले आहे. मात्र, मोबाईल ते मोबाईल अशा आंतरजोडणी शुल्कामध्ये ३० टक्क्यांची कपात करून २० पैशांवरील हे शुल्क आता १४ पैसे इतके कमी करण्यात आले आहे.
मोबाईल फोन सुमारे ९३ कोटी लोकांच्या हाती पोहोचल्यानंतर याचा परिणाम लँडलाईन फोनसेवेला उतरती कळा लागण्याच्या रुपाने दिसून आला होतो. भारत संचार निगम आणि महानगर टेलिफोन निगम लि. या सरकारी कंपन्यांनाही याचा मोठा फटका बसला होता. उपलब्ध आकडेवारीनुसार, मोबाईलधारकांच्या संख्येने झपाट्याने वाढ होत असतानाच देशात आता केवळ दोन कोटी ७० लाख इतकेच ग्राहक शिल्लक राहिले आहेत. मात्र, ट्रायने आज घेतलेल्या निर्णयामुळे लँडलाईन सेवेला गती तर मिळेलच पण, यामुळे गावागावात इंटरनेट सेवेचा वेगही वाढीस लागेल असे मत या क्षेत्रातील जाणकार विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दूरध्वनी सेवेचे दर घटणार
लँडलाईन सेवा लोकप्रिय करून त्या माध्यमातून इंटरनेटची कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या दृष्टीने लँडलाईन फोनवरून अन्य नेटवर्कवर केल्या
By admin | Updated: February 23, 2015 23:44 IST2015-02-23T23:44:39+5:302015-02-23T23:44:39+5:30
लँडलाईन सेवा लोकप्रिय करून त्या माध्यमातून इंटरनेटची कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या दृष्टीने लँडलाईन फोनवरून अन्य नेटवर्कवर केल्या
