मनोज गडनीस, मुंबई
अनेक वेळा एखाद्या बिगर बँकिंग वित्तीय कंपनीकडून कर्ज घेतले अथवा त्यांची एखादी वित्तीय योजना खरेदी केली आणि त्यात जर काही समस्या निर्माण झाली तर, कंपनीकडे दाद मागितल्यावर समाधानकारक उत्तर मिळत नाही. अथवा, आम्ही अमुक एक आश्वासन दिलेच नव्हते अशा आशयाचे उत्तर मिळते. त्यामुळे ग्राहकाची होणारी ओढाताण लक्षात घेतला, आता भारतीय रिझर्व्ह बँकेने बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी नवी मार्गदर्शक प्रणाली बनविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांवर सध्या थेट भारतीय रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण असले तरी या कंपन्यांनी आता स्वत:च्या कामाची सोय म्हणून बहुतांश कामे ही आऊटसोर्स केली आहेत. यातील आऊटसोर्स केलेले सर्वात प्रमुख का म्हणजे या कंपन्यांच्या विविध योजनांची ग्राहकांना थेट होणार विक्री.
ग्राहकाशी संपर्क प्रस्थापित करण्यापासून ते त्याचे प्रोसेसिंग अशी सर्व कामे आऊटसोर्सिंगद्वारे केली जातात. पण, हा योजनांची विक्री करताना हे काम आऊटसोर्स झालेल्या कंपन्यांचे प्रतिनिधी मार्केटिंगच्या नादात अनेकवेळा भुलभुलैय्या निर्माण करणारी आश्वासने देतात. मात्र, त्यानंतर या कंपन्या किंवा त्याचे प्रतिनिधी लुप्त होतात आणि ज्यावेळी दिलेल्या आश्वासनाचा लाभ घेण्याची वेळ ग्राहकावर येते, त्यावेळी मात्र मुख्य कंपनी हात वर करते. अशा आशयाच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर केवळ याच मुद्यावर नव्हे तर एक धोरण म्हणून रिझर्व्ह बँकेने आता ही मार्गदर्शक प्रणाली बनिवण्याचे काम सुरू केले आहे. याची रुपरेखा शिखर बँकेने निश्चित केली असून यावर हरकती व सूचना मागविल्या आहेत.
टेलिमार्केटिंगला लागणार चाप
अनेक वेळा एखाद्या बिगर बँकिंग वित्तीय कंपनीकडून कर्ज घेतले अथवा त्यांची एखादी वित्तीय योजना खरेदी केली आणि त्यात जर काही समस्या निर्माण झाली
By admin | Updated: April 13, 2015 04:10 IST2015-04-13T04:10:32+5:302015-04-13T04:10:32+5:30
अनेक वेळा एखाद्या बिगर बँकिंग वित्तीय कंपनीकडून कर्ज घेतले अथवा त्यांची एखादी वित्तीय योजना खरेदी केली आणि त्यात जर काही समस्या निर्माण झाली
