किशनगंज (बिहार) : चहाचे आरोग्याच्या दृष्टीने व अर्थव्यवस्थेत असलेले महत्त्व लक्षात घेऊन चहाला राष्ट्रीय पेय जाहीर करावे, अशी आग्रही मागणी सोमवारी प्रमुख चहा उत्पादकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
उत्तर बंगाल चहा उत्पादक कल्याण संघातर्फे पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. या पत्राची प्रत प्रसारमाध्यमांना देण्यात आली. हा संघ उत्तर बंगाल व बिहारमधील १०० पेक्षा जास्त चहा कारखान्यांचे प्रतिनिधित्व करतो. हे कारखाने १० कोटी किलोग्रॅमपेक्षा जास्त चहा उत्पादन करतात. देशात चहाचा खप दरवर्षी ३ टक्क्यांनी वाढतो आहे. भारत जवळपास १२० कोटी किलोग्रॅम चहाचे उत्पादन करतो व त्यातील ९० कोटी किलो चहा देशातच खपतो. (वृत्तसंस्था)
‘चहाला राष्ट्रीय पेय जाहीर करा’
चहाचे आरोग्याच्या दृष्टीने व अर्थव्यवस्थेत असलेले महत्त्व लक्षात घेऊन चहाला राष्ट्रीय पेय जाहीर करावे, अशी आग्रही मागणी सोमवारी प्रमुख चहा उत्पादकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
By admin | Updated: September 22, 2014 23:02 IST2014-09-22T23:02:28+5:302014-09-22T23:02:28+5:30
चहाचे आरोग्याच्या दृष्टीने व अर्थव्यवस्थेत असलेले महत्त्व लक्षात घेऊन चहाला राष्ट्रीय पेय जाहीर करावे, अशी आग्रही मागणी सोमवारी प्रमुख चहा उत्पादकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.