नवी दिल्ली : ग्राहक हा राजा असून, त्यांना चालकाने वा कंपनीने टॅक्सीच्या भाड्यात सवलत देता कामा नये, असा आदेश आपण देऊ शकत नाही. त्यांनी मीटरपेक्षा वा ठरल्यापेक्षा कमी भाडे आकारू नये, अशी मागणी करणे चुकीचे आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या चालकांच्या संघटनेने ओला, उबेर या कंपन्यांविरोधात तक्रार केली होती. त्यावर न्यायालयाने हे मत व्यक्त केले. टेलिकॉम कंपन्यांनी फोर-जीचे दर ४0 टक्क्यांनी कमी केले आहेत. त्याचा फायदा ग्राहकांना मिळाला, तर त्यात काय गैर आहे, असेही न्यायालयाने नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
टॅक्सीचालक देऊ शकतात सूट
ग्राहक हा राजा असून, त्यांना चालकाने वा कंपनीने टॅक्सीच्या भाड्यात सवलत देता कामा नये, असा आदेश आपण देऊ शकत नाही.
By admin | Updated: August 31, 2016 04:26 IST2016-08-31T04:26:27+5:302016-08-31T04:26:27+5:30
ग्राहक हा राजा असून, त्यांना चालकाने वा कंपनीने टॅक्सीच्या भाड्यात सवलत देता कामा नये, असा आदेश आपण देऊ शकत नाही.
