Lokmat Money > बिझनेस न्यूज > विदेशातून परतताना आणलेल्या वस्तूंवर लागणार कर

विदेशातून परतताना आणलेल्या वस्तूंवर लागणार कर

विदेशात १ वर्षापर्यंत वास्तव्य करून मायदेशी परतताना आणलेल्या संसारोपयोगी वस्तूंवर १५ टक्के कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकाने घेतला आहे.

By admin | Updated: April 11, 2016 02:00 IST2016-04-11T02:00:01+5:302016-04-11T02:00:01+5:30

विदेशात १ वर्षापर्यंत वास्तव्य करून मायदेशी परतताना आणलेल्या संसारोपयोगी वस्तूंवर १५ टक्के कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकाने घेतला आहे.

Taxes will be required on items brought back from abroad | विदेशातून परतताना आणलेल्या वस्तूंवर लागणार कर

विदेशातून परतताना आणलेल्या वस्तूंवर लागणार कर

नवी दिल्ली : विदेशात १ वर्षापर्यंत वास्तव्य करून मायदेशी परतताना आणलेल्या संसारोपयोगी वस्तूंवर १५ टक्के कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकाने घेतला आहे.
रंगीत टीव्ही, होम थिएटर, दागिने, व्हिडिओ कॅसेट, रेकॉर्डर-प्लेअर, वॉशिंग मशीन, इलेक्ट्रिकल अथवा एलपीजी कुकिंग रेंज, संगणक, लॅपटॉप आणि ३00 लिटरपर्यंतचा घरगुती फ्रीज इ. वस्तूंचा यात समावेश आहे. अशा वस्तूंवर आतापर्यंत कोणताही कर द्यावा लागत नव्हता. पुरुषांना ५0 हजार रुपयांपर्यंत, तर महिलांना १ लाखांपर्यंतच्या दागिन्यांवरही कर लागत नव्हता. अन्य उत्पादनांसाठी केंद्रीय उत्पादन तथा सीमा शुल्क बोर्ड (सीबीईसी) दरवर्षी नियम आणि करांचे दर ठरविते. २0१६-१७ या वर्षासाठी सीबीईसीने करपात्र वस्तूंची सूची जारी केली आहे. ३६५ दिवसांपर्यंत विदेशात राहून आल्यानंतर सोबत आणलेल्या वस्तूंचा या सूचीत समावेश आहे. सूचीतील १३ वस्तूंना आतापर्यंत कर लागत नव्हता.

Web Title: Taxes will be required on items brought back from abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.