लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दुकानाला किंवा व्यापारी प्रतिष्ठानांच्या परिसराला कोणत्याही कर अधिकाऱ्याला पूर्वपरवानगीशिवाय भेट देण्याचे अधिकार नाहीत. तसे काही घडल्यास हेल्पलाइनवर तक्रार करता येईल, असे अर्थमंत्रालयाने निवेदनात म्हटले.
वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) नाव घेऊन काही लबाड लोक दुकानदार आणि ग्राहकांना लुबाडत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सरकारने हा खुलासा केला. जीएसटीच्या मुख्य आयुक्तांनी (दिल्ली झोन) जीएसटी कर पद्धत लागू झाल्यामुळे व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये एवढ्यासाठीच कर विभाग मदत करीत आहे, असे म्हटले. जीएसटीच्या अधिकाऱ्याला दुकानांना पूर्वपरवानगीशिवाय भेट देण्याचे अधिकार दिलेले नाहीत, असे निवेदनात स्पष्ट केले आहे. असा त्रास होत असेल तर तो कर विभागाच्या दूरध्वनी क्रमाक ०११-२३३७०११५ वर तक्रार करू शकतो.
परवानगीशिवाय कर अधिकारी दुकानांना भेट देऊ शकत नाहीत
दुकानाला किंवा व्यापारी प्रतिष्ठानांच्या परिसराला कोणत्याही कर अधिकाऱ्याला पूर्वपरवानगीशिवाय भेट देण्याचे अधिकार नाहीत.
By admin | Updated: July 10, 2017 00:11 IST2017-07-10T00:11:57+5:302017-07-10T00:11:57+5:30
दुकानाला किंवा व्यापारी प्रतिष्ठानांच्या परिसराला कोणत्याही कर अधिकाऱ्याला पूर्वपरवानगीशिवाय भेट देण्याचे अधिकार नाहीत.
