Lokmat Money > बिझनेस न्यूज > करवसुलीचे उद्दिष्ट घटले २,२८८ कोटींनी हुकले

करवसुलीचे उद्दिष्ट घटले २,२८८ कोटींनी हुकले

२0१४-१५ या वर्षातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या वसुलीचे केंद्र सरकारचे सुधारित उद्दिष्ट २,२८८ कोटी रुपयांनी हुकले आहे.

By admin | Updated: May 18, 2015 03:03 IST2015-05-18T03:03:22+5:302015-05-18T03:03:22+5:30

२0१४-१५ या वर्षातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या वसुलीचे केंद्र सरकारचे सुधारित उद्दिष्ट २,२८८ कोटी रुपयांनी हुकले आहे.

The tax collection target was reduced by 2,288 crores | करवसुलीचे उद्दिष्ट घटले २,२८८ कोटींनी हुकले

करवसुलीचे उद्दिष्ट घटले २,२८८ कोटींनी हुकले

नवी दिल्ली : २0१४-१५ या वर्षातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या वसुलीचे केंद्र सरकारचे सुधारित
उद्दिष्ट २,२८८ कोटी रुपयांनी हुकले आहे.
अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारची एकूण कर वसुली १२,४५,0३७ कोटी राहिली. २0१३-१४ या आर्थिक वर्षाच्या कर वसुलीच्या तुलनेत ही वाढ ९ टक्के (१,0६,३0३ कोटी) आहे. तसेच सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ९.८ टक्के आहे.
प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या वसुलीचे सुधारित उद्दिष्ट १२,४७,३२४ कोटी रुपये ठेवण्यात आले होते. तथापि, ते गाठता आले नाही. त्यात अप्रत्यक्ष करांची वसुली ५,४२,३२५ कोटी तर प्रत्यक्ष करांची वसुली ७,0५,000 कोटी गृहीत धरण्यात आली होती. तथापि, प्रत्यक्षात १२,४५,0३७ कोटी रुपयेच वसूल झाले. २,२८८ कोटी रुपयांची तूट वसुलीमध्ये आली.
२0१४-१५ या वर्षात वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४ टक्क्यांवर मर्यादित ठेवण्यात मात्र सरकारला यश आले आहे, असे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे.
एकूण ५,0१,८८0 कोटी रुपयांची वित्तीय तूट या वर्षात राहिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The tax collection target was reduced by 2,288 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.