लंडन : टाटा उद्योग समूहाचा ब्रिटनमधील पोर्ट टालबोट येथील संकटग्रस्त पोलाद प्रकल्प खरेदी करण्यास प्रसिद्ध अनिवासी भारतीय उद्योगपती संजीव गुप्ता इच्छुक आहेत. या प्रकल्पात सुमारे ४ हजार लोक काम करतात.
४४ वर्षी संजीव गुप्ता लिबर्टी हाऊस उद्योग समूहाचे संस्थापक आहेत. हा समूह पोलाद, ग्राहकोपयोगी वस्तू आणि मालमत्ता या क्षेत्रात काम करतो. त्यांनी या पूर्वी ब्रिटनमधील अनेक प्रकल्प बंद होण्यापासून वाचविले आहेत. त्यांनी सांगितले की, टाटांच्या प्रकल्पाची संकटातून सोडवणूक करण्यासाठी आपण ब्रिटिश सरकासोबत बोलणी करण्यास तयार आहोत.
संजीव गुप्ता हे सोमवारी दुबईहून ब्रिटनला परतणार आहेत. ते सरकारी अधिकारी आणि टाटाच्या अधिकाऱ्यांना बोलण्यासाठीच येत असल्याचे सांगण्यात आले. टाटांचा प्रकल्प अधिग्रहित करणार का, या प्रश्नावर गुप्ता यांनी संडे टेलिग्राफला सांगितले की, सरकारसोबत योग्य भागीदारीची आम्हाला गरज आहे. आम्ही चर्चा सुरू केली आहे. टाटासोबतही आम्ही चर्चा सुरू करणार आहोत. या चर्चांमधून यातून नेमके काय बाहेर येईल, हे आताच काही सांगता येऊ शकणार नाही.
संजीव गुप्ता खरेदी करणार टाटांचा प्रकल्प
टाटा उद्योग समूहाचा ब्रिटनमधील पोर्ट टालबोट येथील संकटग्रस्त पोलाद प्रकल्प खरेदी करण्यास प्रसिद्ध अनिवासी भारतीय उद्योगपती संजीव गुप्ता इच्छुक आहेत
By admin | Updated: April 4, 2016 02:37 IST2016-04-04T02:37:15+5:302016-04-04T02:37:15+5:30
टाटा उद्योग समूहाचा ब्रिटनमधील पोर्ट टालबोट येथील संकटग्रस्त पोलाद प्रकल्प खरेदी करण्यास प्रसिद्ध अनिवासी भारतीय उद्योगपती संजीव गुप्ता इच्छुक आहेत
