मुंबई : जागतिक मंदीमुळे संकटात आलेल्या ब्रिटनमधील टाटा स्टील युरोप उद्योगाची सोमवारपासून विक्री प्रक्रिया सुरू होत आहे. या प्रकल्पातील हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचविण्यासाठी आपण चांगला खरेदीदार शोधण्याचे प्रयत करू, असे आश्वासन ब्रिटन सरकारने दिले आहे.
कामगार संघटना आणि विरोधी पक्षांच्या प्रचंड दडपणामुळे ब्रिटन सरकारने वाणिज्यमंत्री साजीद जावीद यांना तातडीने चर्चेसाठी मुंबईला पाठविले आहे. त्यांची मुंबईत टाटा समूहाचे चेअरमन साईरस मिस्त्री आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विक्रीची प्रक्रिया निश्चित करण्यासाठी प्रदीर्घ चर्चा झाली. या बैठकीत कोणत्या मुद्यावर चर्चा झाली. हे सांगण्यास टाटाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला; पण साजीद जावीद म्हणाले की, सोमवार, दि.११ एप्रिलपासून टाटा स्टील आपली विक्रीची प्रक्रिया सुरू करणार आहे. त्याचा उद्योग खरेदी करणारा कोणीतरी गंभीर उद्योगपती मिळावा यासाठी ब्रिटन सरकार प्रयत्न करील. विक्री प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
खरेदीदार शोधण्यासाठी टाटांना भरपूर अवधी दिला जाईल. ब्रिटनमधील पोलाद उद्योग आणि या उद्योगातील कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ब्रिटन सरकार वचनबद्ध आहे. टाटा समूहाच्या ‘बॉम्बे हाऊस’ या मुख्यालयात मिस्त्री आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत जावीद यांची दोन तास बैठक चालली. या बैठकीनंतर त्यांनी टाटा स्टील समूहाचे कार्यकारी संचालक कौशिक चटर्जी यांच्यासोबतही चर्चा केली.
टाटाच्या ब्रिटनमधील व्यवसायाची सोमवारपासून सुरू होणार विक्री
जागतिक मंदीमुळे संकटात आलेल्या ब्रिटनमधील टाटा स्टील युरोप उद्योगाची सोमवारपासून विक्री प्रक्रिया सुरू होत आहे.
By admin | Updated: April 8, 2016 03:10 IST2016-04-08T03:10:32+5:302016-04-08T03:10:32+5:30
जागतिक मंदीमुळे संकटात आलेल्या ब्रिटनमधील टाटा स्टील युरोप उद्योगाची सोमवारपासून विक्री प्रक्रिया सुरू होत आहे.
