Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > महिंद्रा-ओलाचे 40 हजार गाड्यांच्या विक्रीचे लक्ष्य

महिंद्रा-ओलाचे 40 हजार गाड्यांच्या विक्रीचे लक्ष्य

महिंद्रा अँड महिंद्राने 2018 पर्यंत भारतभरातील 40,000 चालक भागीदारांना सबल करण्यासाठी, ओला या देशातील सर्वात मोठ्या शेअर्ड वाहतूक सुविधेसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे

By admin | Updated: September 8, 2016 19:26 IST2016-09-08T18:51:01+5:302016-09-08T19:26:06+5:30

महिंद्रा अँड महिंद्राने 2018 पर्यंत भारतभरातील 40,000 चालक भागीदारांना सबल करण्यासाठी, ओला या देशातील सर्वात मोठ्या शेअर्ड वाहतूक सुविधेसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे

Target for sale of Mahindra-Ola's 40,000 cars | महिंद्रा-ओलाचे 40 हजार गाड्यांच्या विक्रीचे लक्ष्य

महिंद्रा-ओलाचे 40 हजार गाड्यांच्या विक्रीचे लक्ष्य

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - महिंद्रा अँड महिंद्राने 2018 पर्यंत भारतभरातील 40,000 चालक भागीदारांना सबल करण्यासाठी, ओला या देशातील सर्वात मोठ्या शेअर्ड वाहतूक सुविधेसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या माध्यमातून 400 दशलक्ष डॉलरच्या (2,600 कोटी रुपये) एकंदर वाहन विक्री आणि वित्तपुरवठ्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ओलाच्या चालक भागीदारांना आता एकात्मिक व आकर्षक ‘महिंद्रा-ओला’ पॅकेज मिळेल आणि त्यामध्ये विशेष दरांमध्ये महिंद्रा कार्स, झीरो डाउन पेमेंटसह आकर्षक वित्तपुरवठा, सर्वोत्तम व्याजदर, अनुदानित विमा प्रीमिअम, सर्वंकष मेन्टेनन्स पॅकेज, तसेच ओला सुविधेचे विशेष लाभ यांचा समावेश असेल, अशी माहिती महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा व ओलाचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भाविष अग्रवाल यांनी दिली आहे.
आनंद महिंद्रा यांच्या मते, “हा उपक्रम ही काळाची गरज असून, त्यामध्ये भारतीय ग्राहकांच्या, प्रामुख्याने शेअर्ड वाहतुकीला प्राधान्य देणाऱ्या तरुणांच्या सध्याच्या आणि भविष्यातील गरजा पूर्ण केल्या जाणार आहेत. यामुळे किमान 40,000 चालक मालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहाचे साधन मिळणार आहे."
तर भाविष अग्रवाल यांनी सांगितले, “अब्जावधी भारतीयांसाठी वाहतुकीची सुविधा विकसित करण्याचे आमचे मिशन असून त्याला या भागिदारीमुळे चालना मिळेल."

Web Title: Target for sale of Mahindra-Ola's 40,000 cars