पणे : तीन वर्षापूर्वी शहरात हाहाकरा पसरविणा-या स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढण्यास सुरूवात केली असून आज सलग दुस-या दिवशी स्वाइन फ्लूने शहरात दोघांचा मृत्यू झाले आहे. तर आणखी दोन रूग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटीलेटरव ठेवण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील मंगल फाळके ( 55 वर्षे ) आणि सांगली जिल्ह्यातील सुशिल भंडारे ( 47 वर्षे ) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामधील पाडळी या गावच्या फाळके यांना 12 ऑगस्ट पासून सर्दीचा त्रास होत होता. त्यानंतर त्यांनी गावातील स्थानिक रूग्णालयात उपचार घेतले. मात्र, त्यानंतरही फरक पडत नसल्याने त्यांना 16 ऑगस्ट रोजी सातारा येथील खासगी रूग्णालयात पूढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, 17 ऑगस्ट रोजी त्यांच्या घशातील द्रवाचे नमुळे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर 18 ऑगस्ट रोजी त्यांना स्वाइब्न फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर फाळके यांना तत्काळ पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले. दरम्यान, आज दुपारी साडेबाराच्या सुमारास उपचारादरम्यान फाळके यांचा मृत्यू झाला. दुसरा मृत्यू सांगली जिल्ह्यातील शिरोळ गावातील सुशिल कुमारे भंडारे यांचा झाला. भंडारे यांना 24 जुलै पासून सर्दी, खोकला, तसेच श्वास घेण्यास त्रास होत होता. 25 जुलै पर्यंत त्यांनी कोणतेही उपचार घेतले नव्हते. त्यामुळे आजार वाढल्याने त्यांना त्याच दिवशी मिरज येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, काहीच फरक पडत नसल्याने त्यांना 27 जुलै रोजी पुण्यातील एका खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. 28 ऑगस्ट रोजी भंडारे यांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांना स्वाइन फ्लूच्या झाल्याचा अहवाल 30 जुलै रोजी प्राप्त झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर नियमित उपचार सुरू होते. मात्र, आज दुपारी बाराच्या सुमारास त्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.------------------------------------आणखी दोघांची प्रकृती गंभीर दरम्यान, या आजाराचे आणखी दोन नवीन रूग्ण आज दिवसभरात आढळून आले आहेत. तर दोन रूग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर आज दिवसभरात शहरात सुमारे 1 हजार 185 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यातील 115 संशयित रूग्णांवर टँमीफ्लूचे उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर सहा रूग्णांच्या घशातील द्रवाचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.------------------------------------
स्वाइन फ्लूची धोक्याची घंटा ; दिवसभरात दोघांचा मृत्यू आणखी दोघांची प्रकृती गंभीर - दोन दिवसात तिघांचा मृत्यू
पुणे : तीन वर्षापूर्वी शहरात हाहाकरा पसरविणा-या स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढण्यास सुरूवात केली असून आज सलग दुस-या दिवशी स्वाइन फ्लूने शहरात दोघांचा मृत्यू झाले आहे. तर आणखी दोन रूग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटीलेटरव ठेवण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील मंगल फाळके ( 55 वर्षे ) आणि सांगली जिल्ह्यातील सुशिल भंडारे ( 47 वर्षे ) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
By admin | Updated: August 21, 2014 19:33 IST2014-08-21T19:33:19+5:302014-08-21T19:33:19+5:30
पुणे : तीन वर्षापूर्वी शहरात हाहाकरा पसरविणा-या स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढण्यास सुरूवात केली असून आज सलग दुस-या दिवशी स्वाइन फ्लूने शहरात दोघांचा मृत्यू झाले आहे. तर आणखी दोन रूग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटीलेटरव ठेवण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील मंगल फाळके ( 55 वर्षे ) आणि सांगली जिल्ह्यातील सुशिल भंडारे ( 47 वर्षे ) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
